शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

आगामी निवडणुकीत जोेमाने काम करा

By admin | Published: July 14, 2016 12:23 AM

वैभव नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : बांदा येथील ‘शिवबंधन’ मेळाव्यात मार्गदर्शनं

बांदा : बाळासाहेबांच्या विचारांवर निर्माण झालेली शिवसेना आजही त्याच विचारावर यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. अखंड महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा वसा उद्धव ठाकरे यांनी घेतला असून शिवसैनिक तो नक्कीच पेलतील. कार्यकर्त्यांनी यासाठी सजग राहून कार्यरत रहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. बांदा येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवबंधन व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, तालुकाप्रमुख रुपेश राउळ, संपर्क प्रमुख राजु नाईक, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, चंद्रकांत कासार, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, रश्मी माळवदे, भारती देसाई, शुभांगी प्रभुशिरोडकर, तालुका उपप्रमुख भैय्या गोवेकर, विभाग प्रमुख बाळा वाळके, हनुमंत सावंत, शहर अध्यक्ष गिरीश नाटेकर, विक्रांत नेवगी आदि उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाईक म्हणाले, जिल्हा परिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. यासाठी येत्या निवडणुकीत आपल्याला जोमाने काम करुन सत्ता परिवर्तन करायचे आहे. गृहमंत्री दिपक केसरकर यांच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणला आहे. यावर्षी आंबा, शेती नुकसाभरपाईसाठी ३७ कोटी रुपये निधी देण्यात आला. त्यातील ३३ कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. काँग्रेस राजवटीत हाच आकडा केवळ ४ कोटि रुपये होता. त्यातील ३ कोटी रुपये वाटप न केल्याने परत गेले होते. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना जोमाने उतरणार असूून यासाठी गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीतीही वैभव नाईक यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत म्हणाल्या की, जिल्ह्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून येत्या निवडणुकांमध्ये देखिल शिवसेना जिल्ह्यात क्रमांक १ चा पक्ष बनणार आहे. यावेळी प्रकाश परब, राजु नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन भैय्या गोवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)