अमोल गोसावीचौके : चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका मालवण तालुक्यातील काळसे गावाला बसला. काल, सोमवारी सायंकाळी आणि आज, मंगळवार सकाळी हे वादळ झाले.सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता आलेल्या वादळात काळसे ग्रामपंचायत इमारतीवर सागाचे झाड कोसळून छपराचे १ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ग्रामपंचायतीलगत घर असलेल्या जितेंद्र प्रताप बागवे यांच्या घरावर आंब्याचे भलेमोठे झाड कोसळून त्यांच्या घराच्या आणि शौचालयाच्या छप्पराचे सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच त्यांच्या घरातील धान्य आणि इतर साहित्य भिजून नुकसान झाले आहे.याबरोबरच मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भंडारवाडी येथी ज्योती सुधाकर कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे छप्पर, शौचालयावरील दोन पाण्याच्या टाक्या फुटून व त्यावरील लोखंडी छप्पर कोसळून सुमारे ७२,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
असे झाले लाखोंचे नुकसानया व्यतिरिक्त सतत दोन दिवस वारंवार होत असलेल्या वादळी वाऱ्यात घरांवर झाडे पडून, तसेच वाऱ्यामुळे कौले व पत्रे उडून गेल्याने आर्थिक नुकसान झाले. यामध्ये राजश्री राधाकृष्ण घाडी यांचे ९२,०००, सुमन बापू प्रभु १३,८००, लीनता यशवंत परब १२,५००, अरुण मदन परब ८,५००, दीपक गंगाराम परब ९,२००, वैजयंती परशुराम बागवे ८,७००, विश्वनाथ सुयश परब १५,७००, वैशाली बाळकृष्ण परब १२,३००, श्रीकृष्ण भदू परब ९,८००, जयश्री दिगंबर परब १२,९००, शैलजा विजय परब ८,३००, प्रशांत विश्वनाथ हेरेकर ६,९००, उमेश विनायक प्रभू २,५००, राजश्री कृष्णा धुरी ६,६०० असे एकूण सुमारे ५,५८,७००/- रुपयांचे नुकसान काळसे ग्रामपंचायतीसह रहिवाशांचे झाले आहे.
झाड पडून वाहतूक काही काळ ठप्पयाबरोबरच, काळसे रमाईनगर नजीक मुख्य रस्त्यावर सागाचे झाड पडून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारा आणि खांबांवर पडून वीज वितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कर्मचारी आबा परब, योगेश काळसेकर आणि सागर गावठे हे गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
तातडीने पंचनामे सुरूदरम्यान, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, सदस्य मोनिका म्हापणकर, तलाठी नीलम सावंत, ग्रामसेवक पी.आर. निकम यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तलाठी निलम सावंत, कोतवाल प्रसाद चव्हाण यांनी आज सकाळपासून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना सादर केले.