सावंतवाडी : प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गोवा येथील कामाक्षी उडपनाव हिचा खून केल्याचे सांगितले जात आहे.मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली असून कामाक्षी ही आपल्या जुन्या बॉयफ्रेंड सोबत बोलत असल्यानेच संशयित आरोपी प्रकाश चुंचवाड याने कामाक्षी चा खून केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला असून प्रकाश हा संशयी होता.तो कामाक्षी कुणाबरोबर बोलली तरी तिला मारहाण करत होता असे ही नातेवाईकांनी सांगितले.गोवा म्हापसा येथील कामाक्षी शंकर उडपनव या युवतीचा तिच्या प्रियकराने पर्वरी येथील तिच्या राहत्या सदनिकेत खून करून तिचा मृतदेह मित्रांच्या मदतीने आंबोली घाटात फेकला होता.शुक्रवारी गोवा पोलिसांनी आंबोली येथे येऊन मृतदेह ताब्यात घेऊन ते गोव्या कडे रवाना झाले त्यानी गोवा बांबुळी येथे मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.दरम्यान आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होऊ लागले असून संशयित आरोपी प्रकाश व कामाक्षी याच्यात मंगळवारी प्रेम प्रकरणांतून कडाक्याचे भांडण झाले होते.हे खरे असले तरी प्रकाश हा थोडा संशयी होता.कामाक्षी कुणाबरोबर बोलली किंवा फिरली तरी तो कामाक्षी ला मारहाण करत असे कामाक्षी हिचा पूर्वी अजूना गोवा येथील जवळचा मित्र होता.मध्यंतरी ती दोघे बोलत नव्हते याच काळात कामक्षी आणि प्रकाश याच्यात मैत्री झाली होती.दोघे म्हापसा येथे फिरताना अनेकांनी बघितले होते.पण प्रकाश याच्या सशयीवृत्ती मुळे कामाक्षी पुन्हा आपल्या जुन्या मित्रांसोबत बोलू लागली हा प्रकाश ला आवडत नव्हते.या कारणावरून त्याच्यात सतत भांडण होत असे प्रकाश तिला मारहाण ही करत असे याच कारणावरून कामाक्षी वैतागली होती.त्यातूनच मंगळवारी कामाक्षी हिने म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीवरून तर प्रकाश हा आणखी संतापला होता.कामाक्षी हिने पोलीसात तक्रार दिल्यानंतर काहि वेळातच या दोघांना पोलिसांकडून समज देऊन सोडून दिले होते.
मंगळवारी मध्यरात्रीच खून कामाक्षी ही पोलिस ठाण्या वरून रात्रीच्या सुमारास थेट आपल्या पर्वरी येथील सदनिकेत आली तिच्या पाठोपाठ प्रकाश तिच्या घरी आला होता.यावेळी दोघांत जोरदार भांडण झाल्याचे तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.आणि तेव्हाच तिचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रकाशकडून अनेक वेळा मारहाण कामक्षी ची प्रकाश सोबत एक वर्षापूर्वीच ओळख झाली होती.प्रकाश चे पर्वरी येथे गॅरेज आहे.तसेच कामाक्षी चा पर्वरी येथे सदनिका होती.याकाळात तो येऊन जाऊन असायचा मात्र प्रकाश हा संशयी वृत्तीचा असल्याने प्रकाश कडून तिला सतत मारहाण होत होती.