रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध साहित्य प्रकारासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा समितीचे निमंत्रक अरूण नेरूरकर यांनी केली. एकूण सतरा जणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नेरूरकर यांनी सांगितले.कोमसापतर्फे सर्व साहित्य प्रकारांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. दरवर्षीप्रमाणे एकूण १७ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, तर व्दितीय क्रमांकाच्या विशेष पुरस्कारासाठी तीन हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे.पुरस्कार प्राप्त साहित्यिक- र. वा. दिघे स्मृती कादंबरी पुरस्कार मनोज नाईक साटम (अपरांत), वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार स्वप्नगंधा कुलकर्णी (धामापूरचे तळे), वि. सी. गुर्जर स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्रतिभा सराफ (सलग पाच दिवस), विद्याधर भागवत विशेष पुरस्कार गजानन म्हात्रे (तर्क वितर्क), कवितेसाठी आरती प्रभू स्मृती पुरस्कार पूजा मलुष्टे (साकुरा), वसंत सावंत स्मृती (कविता) विशेष पुरस्कार अनघा तांबोळी (उजेडाचे कवडसे), प्रभाकर पाध्ये स्मृती समीक्षा गं्रंथ पुरस्कार डॉ. सतीश कामत (दलित ग्रामीण साहित्य चिंतन व आस्वाद), धनंजय कीर स्मृती चरित्र आत्मचरित्र पुरस्कार अचला जोशी (ज्ञान तपस्वी रूद्र), श्रीकांत शेट्ये विशेष पुरस्कार संगीता धायगुडे (हुमान), अनंत काणेकर स्मृती ललित गद्य पुरस्कार उषा परब (उच्च्यू...माच्च्यू), गवांदे स्मृती विशेष पुरस्कार प्रशांत डिंगणकर (अनुक्रमणिका) बालवाङमय प्रा. नेरूरकर स्मृती पुरस्कार आर्या गावडे, दृकश्राव्य कला, सिनेमा भाई भगत स्मृती पुरस्कार सदाशिव निंबाळकर, संकीर्ण वाङमय अरूण आठल्ये स्मृती पुरस्कार तुकाराम नाईक, नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार प्रा. मधु पाटील, फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार डॉ. शशिकांत लोखंडे. (प्रतिनिधी)
कोमसापचे पुरस्कार जाहीर
By admin | Published: December 10, 2014 12:08 AM