कणकवली : 'स्वच्छ कणकवली , सुंदर कणकवली ' असा संदेश देत कणकवली नगरपंचायत,रोटरी क्लब सेंट्रल व डॉक्टर फ्रायडे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मंगळवारी काढण्यात आली. या प्रभात फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रभातफेरीचा शुभारंभ पटकीदेवी मंदीर येथून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजारपेठ मार्गे निघालेल्या या फेरीची सांगता उपजिल्हा रुग्णालय समोर झाली.यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे,कन्हैया पारकर,सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,महेश सांब्रेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे,प्रतीक्षा सावंत,रोटरी क्लब प्रेसिडेंट महेंद्र मुरकर, दिपल बेलवलकर, दादा कुडतरकर, अॅड.दिपक अंधारी, नितीन म्हापणकर,ब्रँड अॅम्बेसिडर डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ.संदीप नाटेकर,डॉ. स्वप्नील राणे,डॉ.सुहास पावसकर,डॉ.संगीता मोघे ,मीनल आपटे, वृषाली पाकळे, मेस्त्री,शेखर राणे,उदय आळवे तसेच आयडीयल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी,नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
कणकवलीतून मंगळवारी काढलेल्या कनक स्वच्छता अभियान प्रभात फेरी मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक, तसेच रोटरी क्लब, डॉक्टर फ्रायडे क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.(अनिकेत उचले )कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.तसेच सुका,ओला,कचरा वर्गीकरण,प्लस्टिक बंदी या विषयी जनजागृती केली जात आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये रोटरी क्लब व डॉक्टर फ्रायडे क्लब यांनी सहभागी होत स्वच्छता सर्वेक्षणा विषयीचे पत्रक वाटप करत स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
तसेच डिजीटल तंत्र स्क्रिनद्वारे स्वच्छताविषयीची डॉक्युमेंटरीव्दारे जनजागृती केली.पटकीदेवी मंदिर मार्गे ढालकाठी- बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक हायवे मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे जात या फेरीचा समारोप करण्यात आला.स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे !कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम शासनाचा एक भाग म्हणून न रहाता यामध्ये सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी बहुसंख्येने त्यामध्ये सहभागी व्हावे. या प्रभात फेरीत रोटरी क्लब, डॉक्टर फ्रायडे क्लब तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहर स्वच्छतेसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे मी विशेष कौतुक करतो, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यावेळी म्हणाले.