शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

झिंग झिंग झिंगाटच्या गाण्यावर कणकवलीकर थिरकले, अजय-अतुलची म्युझिकल नाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:09 PM

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात रविवारी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या जोडीने कणकवलीकरांना आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचायला लावले. तरूणांसह बच्चे कंपनीने रंगमंचा समोर येऊन ठेका धरला. झिंग-झिंग झिंगाट सह डॉल्बी डॉल या गाण्यांवर कणकवलीकरांनी ठेका धरला. त्यामुळे अजय-अतुल म्युझिकल नाईट सिंधुदुर्ग वासियांसाठी खऱ्या अर्थाने यादगारच ठरली.

ठळक मुद्देझिंग झिंग झिंगाटच्या गाण्यावर कणकवलीकर थिरकलेअजय-अतुलची म्युझिकल नाईट ठरली यादगार; हजारो प्रेक्षकांची उपस्थिती

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात रविवारी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या जोडीने कणकवलीकरांना आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचायला लावले. तरूणांसह बच्चे कंपनीने रंगमंचा समोर येऊन ठेका धरला. झिंग-झिंग झिंगाट सह डॉल्बी डॉल या गाण्यांवर कणकवलीकरांनी ठेका धरला. त्यामुळे अजय-अतुल म्युझिकल नाईट सिंधुदुर्ग वासियांसाठी खऱ्या अर्थाने यादगारच ठरली.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पेतून साकारलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि सहकाऱ्यानी योग्य नियोजन केले होते. या महोत्सवात चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. अजय-अतुलच्या म्युझिकल नाईटसाठी सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने असंख्य प्रेक्षक लहान मुलांसह कणकवलीत रविवारी दाखल झाले होते.रात्री उशिरापर्यंत या महोत्सवातील सांगीतिक कार्यक्रम रंगला होता. खाद्य पदार्थांच्या स्टॉलला देखील खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील संपूर्ण मैदान गर्दीने फुलले होते.रंगमंचावर अजय-अतुलची जोडी ह्यदेवा श्री गणेशा़ !ह्ण या गाण्याच्या साथीने दाखल झाली. आणि काही वेळातच सिंधुदुर्गवासियांना त्यांनी आपल्या गायकीने भुरळ घातली.अशा कार्यक्रमांना मोठ्या शहरांमध्ये जशी गर्दी असते तशीच या महोत्सवाच्या निमित्ताने पहायला मिळाली. तरूण-तरूणींनी उत्स्फुर्तपणे रंगमंचा समोर धाव घेत अजय-अतुलच्या गीतांच्या साथीने ठेका धरला.अजय-अतुल यांनी 'देवा श्री गणेशा' , 'याड लागलं रं....' , ' आता रूसायचे नाय' , 'रंग उरलेला लावून टाक...' , 'ये डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला' ,' झिंग झिंग झिंगाट़' , ' तुझ्या प्रिरतीचा हा विंचू मला चावला', यासह विविध गाण्यांवर कणकवलीकरांना नाचविले. अनेक गाण्यांवर 'वन्स मोअरची' मागणी प्रेक्षकांमधून झाली. केवळ तासाभराच्या कालावधीत हजारो प्रेक्षकांच्या मनावर अजय-अतुल या जोडीने अधिराज्य गाजविले.त्यानी प्रेक्षकांना रंगमंचा समोर नाचण्यासाठी आमंत्रीत केले. त्यामुळे एकच गर्दी उसळली. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह मान्यवरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. रंगमंचासमोर मोकळ्या जागेत सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी ताल धरत अजय-अतुलचा उत्साह आनखिनच वाढविला. त्यामुळे कणकवली महोत्सवाचा सांगता सोहळा सर्वांसाठीच यादगार ठरला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अनेक कलाकारांनी आपली कला या महोत्सवात सादर केली.राणेंच्या एका फोनवर आम्ही कणकवलीत !कणकवलीच नव्हे तर संपुर्ण कोकणातील अजय-अतुलचा हा पहिला कार्यक्रम होता. एवढी गर्दी होईल याची कल्पना आम्हाला नव्हती. कणकवलीत महोत्सव आहे. त्यावेळी तुम्हाला यायला लागेल. एवढा निरोप एका फोनवर आमदार नितेश राणे यांनी आम्हाला दिला. त्यापलिकडे आमचे बोलणे देखील झाले नाही. तरीपण राणे कुटुंबीयांच्या प्रेमा खातर आम्ही कणकवलीत आलो. कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या प्रेक्षकांमुळे आमचे मन भारावून गेले आहे़. पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी पुढील काळात द्यावी, अशी प्रतिक्रीया प्रसिध्द संगीतकार गायक अजय गोगावले यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Ajay-Atulअजय-अतुलsindhudurgसिंधुदुर्ग