कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:31 PM2019-10-01T15:31:06+5:302019-10-01T15:32:35+5:30

कणकवली विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेस पक्षाचाच आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही इतर पक्षांबरोबर आघाडी झाल्यास हा मतदार संघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. त्यासाठी वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचे सर्वानुमते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.

Kankavali assembly constituency should get Congress! | कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा !

कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा !

Next
ठळक मुद्देकणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा !कणकवलीत बैठक : पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी

कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेस पक्षाचाच आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही इतर पक्षांबरोबर आघाडी झाल्यास हा मतदार संघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. त्यासाठी वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचे सर्वानुमते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.

कणकवली येथील काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी कुडाळ येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. तसेच संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, संजय राणे, सरचिटणीस प्रविण वरुणकर, नादिरशा पटेल,शहर महिला अध्यक्ष दिव्या साळगावकर, शहर उपाध्यक्ष निलेश मालंडकर,सरचिटणीस महेश तेली, रवींद्र तेली, प्रकाश गोवेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kankavali assembly constituency should get Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.