कणकवलीत काँग्रेसच्यावतीने इंधन दर वाढी विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:08 IST2021-03-26T17:04:50+5:302021-03-26T17:08:10+5:30
Kankvali Congress Sindhudurg- केंद्र सरकारच्या तीन कृषीविरोधी कायद्याचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयाच्याबाहेर शुक्रवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसीलदार आर. जे. पवार यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

कणकवली तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने उपोषण करण्यात आले. यावेळी नागेश मोरये, महिंद्र सावंत, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.
कणकवली : केंद्र सरकारच्या तीन कृषीविरोधी कायद्याचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने
येथील तहसिलदार कार्यालयाच्याबाहेर शुक्रवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसीलदार आर. जे. पवार यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी बांधवांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व इंधन दर वाढ कमी करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये , जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत , कणकवली शहराध्यक्ष महेश तेली, तालुका सरचिटणीस प्रविण वरुणकर, युवक अध्यक्ष निलेश तेली , प्रदिप तळगांवकर , नादिरशहा पटेल , निलेश मालंडकर , प्रमोद घाडीगांवकर , पंढरी पांगम , परेश एकावडे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.