कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'कणकवलीची सत्ता द्या, आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू' असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही आमचे सर्वच लोकप्रतिनीधी व सहका-यांनी एकत्र मिळून विविध विकास कामे केली आहेत. कणकवली-जानवली पूल अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प होता. यामुळे कणकवली शहर आणि ग्रामीण भाग जोडला जाईल. हा पुल सर्वांगुण विकासाचा दुवा ठरेल अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पूलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राणे म्हणाले, या पूलामुळे कणकवलीमध्ये वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच जानवली व लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सोयीचे ठरेल. पालकमंत्र्यांनी आमच्या या पुर्ण संकल्पनेला ख-या अर्थाने सत्यात उतरवण्यात आम्हाला फार मोठी ताकद दिली. या पुलाचे काम १५ जून पर्यंत पूर्ण होईल.
कणकवली-जानवली पूल सर्वांगीण विकासाचा दुवा ठरेल - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: March 09, 2024 12:42 PM