कणकवली : देशाची आर्थिक पारतंत्र्याकडील वाटचाल रोखण्यासाठी गुरुवारी भारत बंद पुकारण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनांकडून जाहिर करण्यात आले होते. विविध संघटनानी त्याला पाठिंबा दिला होता. कणकवली शहरासह जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर व्यापाऱ्यानी कणकवली शहरातून सकाळी 10 वाजता रॅली काढली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पावसकर यांना दिले.
या भारत बंदच्या पार्श्वभूमिवर कणकवली तालुका व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सर्व व्यापारी, व्यावसायिक , छोटे विक्रेते यांनी एकत्र येत रॅली काढली. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथून बाजारपेठ मार्गे महामार्गावरूनकणकवली तहसील कार्यालयापर्यन्त ही रॅली काढण्यात आली.
यावेळी कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, महेश नार्वेकर, राजन पारकर, आनंद पोरे, यशवंत खोत, राजेश राजाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, हॉटेल व्यावसायिक शेखर गणपत्ये, विलास कोरगावकर, उदय वरवडेकर, अनिल डेगवेकर निवृत्ती धडाम, दीपक बेलवलकर,मोहन तळगावकर,नितीन पटेल, कपूर,प्रभाकर कोरगावकर,विलास कोरगावकर,प्रशांत साटविलकर, बापू पारकर,महेश कुडाळकर,नंदू आळवे, प्रशांत अंधारी आदी उपस्थित होते. याबंद मध्ये कणकवली तालुका व्यापारी संघाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये किराणा दूकानदार , कापड़ व्यावसायिक , हॉटेल व बार व्यावसायिक, फळ भाजी विक्रेते, बेकरी, सुवर्णकार , सलून व्यावसायिक , पानपट्टी चालक तसेच इतर व्यावसायिकही सामिल झाले होते. त्यामुळे कणकवलीत शुकशुकाट पसरला होता. तहसील कार्यालयाजवळ रॅली आल्यानंतर व्यापऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर ठिकाणिहि बंदला चांगला प्रतिसाद लाभला. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
कड़क पोलिस बंदोबस्त !
बंदच्या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह तालुक्यात कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यात इतर ठिकाणिहि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कणकवली तहसीलदार संजय पावसकर यांना व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.