शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी 

By सुधीर राणे | Published: November 01, 2023 11:47 AM

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले

कणकवली:  बदलत्या काळानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मिळविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मंगळवारी कणकवली येथील मराठा समाजाच्या कॅण्डल मार्चच्यावेळी सकल मराठा समाजाने केला.मराठा समाजाचे नेते म्हणून मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी जोरदार  घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.मराठवाड्यात आरक्षणासाठीची आग धगधगत आहे. तिचे पडसाद हळूहळू सिंधुदुर्गात उमटू लागले आहेत. कणकवली शहरामध्ये मराठा समाजाच्यावतीने मेणबत्ती पेटवून आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आरक्षणाला तीव्र विरोध करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. मात्र, पोलिसांनी तत्काळ पुतळा बाजूला हठविला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्ते हळूहळू जमा होत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे नेते एस.टी.सावंत, लवू वारंग, एस.एल. सपकाळ, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,महेंद्र सांबरेकर, संदीप राणे, गणेश काटकर, सुशांत नाईक, अनंत राणे, डॉ. तुळशीराम रावराणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आंदोलनाच्या पुढील दिशेबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षण