कणकवली : कणकवली शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे . तर पादचाऱ्यांनाही महामार्गावरून चालणे अवघड झाले आहे. या होणाऱ्या त्रासामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.गेले आठवडा भर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊन साचल्याने चिखल ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे . त्यामुळे या रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांसाठी अशक्य बनत आहे . पाऊस थांबल्यावर पाणी वाहून गेल्याने काहीसा दिलासा मिळत असला तरी पुन्हा पाऊस आल्यावर तशीच स्थिती निर्माण होत आहे.शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा गटारे नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबल्याने चिखल तयार होत आहे . येथे पादचाऱ्यांना चालणे अवघड होत आहे. सर्व्हिस रोड सुस्थितीत नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.रात्रीच्या वेळी वाहन चालकांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. या समस्येची दखल महामार्ग ठेकेदार कंपनीने वेळेत घ्यावी आणि काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कणकवलीत महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:43 PM
कणकवली : कणकवली शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे . तर पादचाऱ्यांनाही महामार्गावरून ...
ठळक मुद्देकणकवलीत महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त ! पादचाऱ्यांनाही महामार्गावरून चालणे अवघड