शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

कणकवली नगरपंचायतीचा साडे दहा कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:01 PM

कणकवली नगरपंचायतीचा सन सन २०१९-२० चा १० कोटी ६९ लाख १४ हजार ५७८रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ३० कोटी ५४ लाख ९३ हजार ५०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायतीचा साडे दहा कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर सन २०१९-२० चा शिलकीचा अर्थसंकल्प

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन सन २०१९-२० चा १० कोटी ६९ लाख १४ हजार ५७८रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ३० कोटी ५४ लाख ९३ हजार ५०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत.नगरपंचायतीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे , लेखापाल भगवान कदम , सभा लिपिक किशोर धुमाळे, नगरसेवक उपस्थित होते.कणकवली नगरपंचायतीचा मागील वर्षाचा म्हणजेच सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प २९ कोटी ५१ लाख १२ हजार ४५८ रुपयांचा होता. तर सन २०१९-२० चा अर्थसंकल्प ४१ कोटी २४लाख ८हजार ७८ रुपयांचा आहे . हा अर्थसंकल्प शिलकीचा असून १० कोटी६९ लाख १४ हजार ५७८रुपये नगरपंचायतीकडे शिल्लक रहाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नगरपंचायतीकडे प्रारंभिक शिल्लक ४ कोटी ६८ लाख ३१ हजार ७७८ रुपये होती.तर सन २०१९-२० मध्ये विविध कराच्या माध्यमातून महसुली जमा ११कोटी ८३ लाख ८हजार ३०० रुपये होतील. शासकीय अनुदान तसेच इतर माध्यमातून २४कोटी ७२लाख ६८हजार रुपये भांडवली जमा होतील. त्यामुळे एकूण जमा ४१ कोटी २४लाख ८हजार ७८ रुपये होण्याची शक्यता आहे . खर्चाची बाजू पहाता ११कोटी४०लाख ५००रुपये महसुली खर्च होईल. तर भांडवली खर्च १९कोटी १४ लाख ९३ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३०कोटी ५४ लाख ९३हजार ५००रुपये इतका खर्च सन २०१९-२० मध्ये अपेक्षित धरण्यात आला आहे.गतवर्षी पेक्षा सुमारे १२कोटींनी अर्थ संकल्पात वाढ झाली आहे. यामध्ये नागरिकांवर विशेष असा कर वाढविण्यात आलेला नाही . मात्र, घरपट्टीमध्ये दहा टक्के वाढ अपेक्षित धरलेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नही काही प्रमाणात वाढणार आहे.अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या एकूण रकमेत वाढ होणार आहे. त्यामध्ये १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत ४ कोटी रुपये, नगरोत्थान जिल्हास्तर योजनेतून ३५कोटी, नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेतून २०कोटी तसेच नागरी दलित वस्ती ५लाख, पर्यटन विशेष अनुदान ३ लाख व स्वच्छ भारत अभियान मधून दिड कोटी रुपयांचा समावेश असून शासनाजवळ हा निधी मागणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.नगराध्यक्षांकडून मानधन शहीद जवानांच्या कुटुंबियांना !पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपले वर्षभराचे मानधन ३०हजार रुपये देण्याचे या सभेत जाहीर केले. तर नगरसेवकानीही आपले मानधन देण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायत कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन शहिदांच्या कुटुंबियांना देणार आहेत. या निर्णयामुळे नगराध्यक्ष तसेच नगरपंचायतीने एक वेगळा आदर्श इतर नगरपंचायतींसमोर निर्माण केला आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग