शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

कणकवली नगरपंचायत विशेष सभा : त्या' ठेकेदारांना 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाका : समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:21 PM

कणकवली शहरातील बाजारपेठ तसेच अन्य भागातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या व पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराना नगरपंचायतीच्यावतीने नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कामाबाबत पुढील काहीच कार्यवाही होत नाही . त्यामुळे संबधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे, अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्याना केली.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत विशेष सभा  त्या' ठेकेदारांना 'ब्लॅक लिस्ट' मध्ये टाका : समीर नलावडे 

कणकवली : कणकवली शहरातील बाजारपेठ तसेच अन्य भागातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या व पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराना नगरपंचायतीच्यावतीने नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कामाबाबत पुढील काहीच कार्यवाही होत नाही . त्यामुळे संबधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे .अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्याना केली.कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , मुख्याधिकारी मनोज उकिर्डे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षानी सभेत उपस्थित झालेल्या मुद्यावर बोलताना ही सूचना केली.या सभेत प्रामुख्याने कणकवलीतील खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाचा मुद्दा चर्चेत आला. तसेच पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम बरेच दिवस अपूर्णावस्थेत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होतो. असा मुद्दा नगरसेवक अबीद नाईक यांनी उपस्थित केला होता.

त्याविषयी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरातील रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेले सहदेव चव्हाण व गटाराच्या कामाचा ठेका घेतलेले ए. पी.सावंत या ठेकेदाराना नगरपंचायत प्रशासनाने नोटीस बजावूनही त्याची दखल त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे त्या ठेकेदारांना' ब्लॅक लिस्ट ' मध्ये टाकून उर्वरित काम अन्य ठेकेदाराकडून करून घ्यावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी सूचना केली.शहरातील अनेक ठिकाणचे पथदीप बंद आहेत. ते तत्काळ सुरू करावेत अशी मागणी नगरसेवक अबीद नाईक यांनी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यानी पथदीपांबाबतचा संबधित ठेका शासनाने राजस्तरावरून एका कंपनीला दिलेला आहे. त्या कंपनीशी संपर्क करण्यात आल्याचे सांगितले.कणकवली साईंनगर येथील उद्यानात नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला . सन २०१८-१९ सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान (जिल्हास्तर) योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून टेंबवाडी रस्ता जमीन भूसंपादन तसेच इतर कामे करण्यात येणार आहेत. तर सन २०१९-२० च्या निधीतून आणखीन काही कामे नगरसेवकांकडून सुचविण्यात आली.शहरातील उद्यानांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नगरपंचायतीने कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी मेघा गांगण यांनी केली. तर काही उद्याने ही 'लव्हर्स पॉईंट' बनली असल्याचे अभिजित मुसळे म्हणाले. त्यामुळे उद्यानांच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिनीच्या कामाकरता रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी देण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यानी वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करावी आणि त्यानंतरच परवानगी द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले. वरचीवाडी गणपती साना येथे घाट बांधणे व रस्ता तयार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.कणकवली मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत येणाऱ्या काही नागरिकांकडून लाकडांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. तसेच लाकडांसाठी आकारले जाणारे शुल्कही अनेकांकडून जमा केले जात नसल्याने नगरपंचायतीच्या लेखा परीक्षणात त्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आल्याचे यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच लाकडांबाबतचा निर्णय या सभेत घ्यावा असे सुचविले.यावेळी झालेल्या चर्चेअंती त्या स्मशानभूमीत कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे तसेच सिसीटीव्ही कॅमेरा बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच लाकडांचे मूल्य आकारून संबंधितांना पावती देण्याचेही ठरविण्यात आले. माणुसकीच्या भावनेतून या प्रश्नावर तोडगा काढावा असे बंडू हर्णे यांनी यावेळी सुचविले.शिवाजीनगर येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी असलेल्या जिन्याला लोखंडी दरवाजा लावून तो बंदिस्त करावे. तसेच ते उद्यान नागरिकासाठी खुले करावे असेही यावेळी ठरविण्यात आले. तेथील रस्ता सहा मीटरचा आहे. मात्र, सद्यस्थितीत तो तेव्हढ्या रुंदीचा असल्याचे दिसत नाही . त्याबाबतही लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे संजय कामतेकर यांनी सुचविले.यावेळी विविध प्रकारच्या निधीतून करायच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. काही नगरसेवकांनी विविध कामे यावेळी सुचविली. या सभेला विरोधी नगरसेविका सुमेधा अंधारी यांच्या व्यक्तिरिक्त अन्य कोणीही नगरसेवक उपस्थित नव्हते.विद्युत दाहिनी बसविणार !कणकवली मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत विद्युुत दाहिनी बसविण्याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली. ज्या नागरिकांना पारंपारिक पध्द्तीने अंत्यसंस्कार करायचे असतील त्यांच्यासाठी सध्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, आधुनिक पध्द्तीने व प्रदूषण विरहित पध्द्त ही विद्युत दाहिनीमुळे शक्य आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दोन्ही प्रकारे अंत्यसंस्कार करता येणे लवकरच शक्य होणार आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग