चिपळूण : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर साऱ्यांसाठीच कुतूहलाचा विषय असतो. त्यातही राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर क्वचितच दृष्टीस पडतो. चिपळूण येथील ओरायन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स विद्यान अभ्यास दौऱ्यादरम्याने दत्तात्रय थोपटे यांच्या कृषी पर्यटन केंद्रात या मोराचे दर्शन झाले आणि सर्वांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात बंद केले. कपिलाषष्ठीचा हा योग जुळून आल्याचे अनेकांच्या तोंडून यावेळी बाहेर पडले. देवांचा सेनापती कार्तिकेय आणि वाग्देवी सरस्वती यांचे वाहन असलेला सर्वांगसुंदर मोर हा भारताचा साऱ्या जगाने मान्यता दिलेला राष्ट्रीय पक्षी. मोर नाचत असताना त्याची पिसे सप्तरंगासारखी दिसतात. साधारणत: आकाशात ढग गोळा झाले की, मोर नाचतो. तेव्हा त्याची पिसे गळतात. निसर्गनियमाप्रमाणे तशीही ती आॅगस्टनंतर गळतात. उन्हाळ्यात ती पुन्हा येतात. मादीला आकर्षित करणे, हा या पिसारा फुलवण्यामागचा मुख्य उद्देश असतो. मोराच्या पिसाऱ्याची लांबी, त्याच्या एकूण शरीराच्या ६० टक्के इतकी असते. मोराच्या या लांबलचक पिसाऱ्याखाली राखाडी रंगाची पिसे असतात. ही पिसे मुख्या पिसाऱ्याला भक्कम आधार देतात. ही मोरपिसं जितक्या वेळेस ही गळून पडतात, तितक्या वेळेस ती पुन्हा येत राहतात. त्यामुळे गळलेली राखाडी रंगाची पिसे असलेला मोर सहसा पिसारा फुलवताना, नाचताना, बागडताना दिसत नाही. कारण त्यात काही गंमत नाही आणि मुख्यत्वे त्या पिसाऱ्याने तो मादीला आकर्षित करू शकत नाही. हे निसर्गनियमित तत्व असले तरी तत्त्वाला अपवाद असतातच. असाच अपवादात्मक राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर चिपळुणात आढळून आला. (प्रतिनिधी)चिपळूण येथील दत्तात्रय थोपटे यांच्या कृषी पर्यटन केंद्रात राखाडी रंगाच्या मोराचे दर्शन झाले. या मोराचे अनेकांनी दर्शन घेत छायाचित्रही टिपली.
कपिलाषष्ठीचा योग जुळून आला...
By admin | Published: December 24, 2015 9:53 PM