वैभववाडी : करुळ बौद्धवाडी येथे लागलेल्या आगीत दोन बागांमधील सुमारे ७०० काजू कलमे जळून खाक झाली आहेत. तसेच खांबाळे येथील जुवाड्याच्या माळरानास रविवारी सायंकाळी आगीचा भडका उडाला. त्यामध्ये शेकडो एकर माळरानावरील जंगली झाडे, काजू जळून भस्मसात झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.करुळ येथील शेतकरी रवींद्र पवार आणि उदय पवार या शेतकऱ्यांच्या काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे सुमारे चार वर्षांची सुमारे ७०० काजू कलमे जळून खाक झाली आहे. कृषी सहाय्यक वाघ व तलाठी बचाटे यांनी जळीताचा पंचनामा केला केला.रविवारी सायंकाळी खांबाळेतील जुवाड्याच्या माळरानावर आगीचा भडका उडाला. त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. माळरानावरील वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत अनेक काजू बागा तसेच बांबू व जंगली झाडे जळून भस्मसात झाली आहेत. तेथील आगीत झालेल्या नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.
करुळ, खांबाळेतील आगीत काजू बागा बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 5:03 PM
करुळ बौद्धवाडी येथे लागलेल्या आगीत दोन बागांमधील सुमारे ७०० काजू कलमे जळून खाक झाली आहेत. तसेच खांबाळे येथील जुवाड्याच्या माळरानास रविवारी सायंकाळी आगीचा भडका उडाला. त्यामध्ये शेकडो एकर माळरानावरील जंगली झाडे, काजू जळून भस्मसात झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देकरुळ, खांबाळेतील आगीत काजू बागा बेचिराखकाजू बागा तसेच बांबू व जंगली झाडे जळून भस्मसात