शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

सिंधुदुर्ग: आंबोली गेळे या ठिकाणी फुलली सोळा वर्षांनी कारवी, निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साह

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 21, 2022 6:07 PM

या फुलांची जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते.

आंबोली : पश्चिम घाटामध्ये जैवविविधतादृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंबोली व गेळे गावामध्ये सध्या तब्बल १६ ते १८ वर्षांनी फुलणाऱ्या आणि केवळ कडेकपाऱ्यावर उगवणाऱ्या एक प्रकारच्या कारवी झुडपाची फुले फुलली आहेत. याबाबत बेळगाव येथील वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते - प्रभूखानोलकर यांनी सांगितले की, या फुलाला १६ ते १८ वर्षांनी फुलोरा येतो. उंच उंच कपाऱ्यांवर कड्यांवर या झुडपांचा अधिवास आहे.कारवी या प्रकारामध्ये हे झुडुप ओळखले जाते. ही जात अतिशय दुर्मीळ असून, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्ये त्याचे अस्तित्व पाहायला मिळते. निळ्या जांभळ्या रंगाची ही फुले खूपच सुंदर असतात. उत्तर कर्नाटक, गोवा येथील दूध सागर, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, आंबोली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येतही काही ठिकाणी या कारवीचे अस्तित्व आढळून आले आहे. या कारवीला जेव्हा फुलोरा येतो, त्यावेळी या कारवीची पाने गळून पडतात. तसेच ही कारवी अतिशय धोकादायक ठिकाणी उगवते म्हणजे सपाट अगदी सरळसोट कड्यावर या कारवीचा अधिवास आहे.निसर्गप्रेमींमध्ये कारवी बघण्यासाठी उत्साहकारवीचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या काही कारवी सात वर्षांनी फुलतात, तर काही बारा वर्षांनी फुलतात. तर काही दरवर्षी फुलतात. त्यामुळे वनस्पती अभ्यासक तसेच निसर्गप्रेमींमध्ये ही कारवी बघण्यासाठी खूप उत्साह आहे. या झाडांचा फुलोरा आणखी दोन आठवडे पाहता येणार आहे. निसर्गातील या अद्भूत आणि खूपच दुर्मीळ अशा नजाऱ्याचा आनंद घेत असताना या फुलांना किंवा ही फुले पाहत असताना स्वतःला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती आंबोलीतील मलाबार नेचर कंझर्वेशन क्लबचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर