शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

कासवमित्र विश्वास खरेंची धारदार शस्त्राने हत्या हल्लेखोर पर्यटक

By admin | Published: October 01, 2014 11:37 PM

: सोन्याची चेन गायब

गुहागर : येथील कासवमित्र विश्वास खरे (वय ५५) यांची दोन अज्ञात पर्यटकांनी कोयत्याने डोक्यावर व मानेवर वर्मी वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज, बुधवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. खरे यांच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपयांची दहा तोळ्यांची सोन्याची चेन गायब झाली असल्याने हा खून सोन्याच्या हव्यासापोटी केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. काल, मंगळवारी सायंकाळी दोन पर्यटक वरचा पाट येथे विश्वास खरे यांच्या ‘खरे प्लेझर पॉर्इंट’ येथे राहण्यासाठी आले. सायंकाळी ६.३० वाजता खरे यांचा मोठा भाऊ विवेक व पुतण्या सचिन यांना विश्वास खरे यांचे ‘खरे प्लेझर पॉर्इंट’ कुठे आहे, अशी विचारणा पर्यटकांनी केली. यावेळी नेहमीप्रमाणे पर्यटक आहेत, असे समजून त्यांना राहण्यासाठी खोली देण्यात आली. रात्रभर या दोघांनी समुद्रकिनारी माडाच्या बनात असलेल्या खोलीमध्ये मुक्काम ठोकला. सकाळी ६.३० वाजता विश्वास खरे यांच्या पत्नी या पर्यटकांसाठी चहा घेऊन गेल्या. त्यानंतर आॅर्डरनुसार सकाळी ९.३० वाजता कांदापोहे देण्यासाठी गेल्या. यावेळी येथे खरे होते व वातावरण नेहमीसारखेच होते. यानंतर दोन तास होऊन गेले तरी खरे का आले नाहीत, हे पाहण्यासाठी खरे यांच्या पत्नी पर्यटकांच्या खोलीकडे आल्या. यावेळी पर्यटकांसाठी तातडीने सेवा देण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वयंपाक खोलीला बाहेरुन कुलूप लावले होते. खरे यांची दुचाकी ही नेहमीच्या ठिकाणीच होती. अशावेळी खरेंचा आजूबाजूला शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी आपले दीर विवेक खरे यांना बोलावले. त्यांनी किचन शेडच्या दरवाजावरील कुलून तोडले. त्यावेळी विश्वास खरे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांना दिसले.याबाबतचे वृत्त समजताच लोकप्रतिनिधींसह सर्वच गुहागरवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. खरे यांचा खून नक्की कोणत्या कारणासाठी झाला असेल, याबाबत ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा रंगली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अज्ञात खुन्यांनी खरे यांचा खून केल्यानंतर राहत असलेल्या खोलीत अंघोळ करून कपडे बदलून पलायन केले. रक्ताचे डाग असलेले कपडे एका जॅकेटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.तपासाला गती मिळण्यासाठी खुनी नेमके कुठल्या दिशेला गेले असावेत, यासाठी श्वानपथक मागविण्यात आले. हे श्वानपथक वेलदूर मार्गावर गेले. तेथील गुहागर शाळा क्रमांक दोनजवळ घुटमळले. त्यामुळे खुनी तेथून पळाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, पुढे कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही. याबाबत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, घटनास्थळी खून झाल्यानंतर खरे यांच्या गळ्यातील १०० ग्रॅमची (१० तोळे) अंदाजे तीन लाख रुपयांची सोन्याची चेन वगळता हातातील अंगठ्या, पैशाचे पाकीट, अन्य सर्व वस्तू जागीच असल्याने सध्या तरी सोन्यासाठीच हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)५५ वर्षीय विश्वास खरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून गुहागर तालुक्यात ओळखले जात होते. कुस्ती खेळ, रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धा त्यांची विशेष आवड होती. गेल्या तीन वर्षांत त्यांनी एक हजारांहून अधिक कासवांना जीवदान दिल्याने ‘कासवमित्र’ म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.