शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

अंडरपासचा निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवा-कणकवलीतील नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 7:26 PM

कणकवली शहरातील गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि टेंबवाडी रस्ता मुंबई -गोवा महामार्गाला जोडला जात आहे. त्यामुळे गांगो मंदिरनजीक अंडरपास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद

ठळक मुद्देगांगोमंदिरजवळील महामार्ग चौपदरीकरण काम

कणकवली : कणकवली शहरातील गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि  टेंबवाडी रस्ता मुंबई -गोवा महामार्गाला जोडला जात आहे. त्यामुळे गांगो मंदिरनजीक अंडरपास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद ठेवा. अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा कणकवली शहरवासीयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिला. 

कणकवली नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता गणेश महाजन,  नगरपंचायतीचे अधिकारी तसेच शिशिर परुळेकर, रामदास मांजरेकर, अभय राणे, अनिल शेट्ये, सोमनाथ गायकवाड, परेश परब, संदीप नलावडे, चंद्रशेखर चव्हाण, आनंद राणे, पिंट्या चव्हाण, एकावडे, ललित राणे, औदुंबर राणे आदी नागरिक आणि व्यापाºयांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांना संबधित इशारा दिला.

यावेळी बंडू हर्णे म्हणाले, गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि टेंबवाडी रस्ता मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जात आहे. हे  दोन्ही रोड एकत्र येत असल्यामुळे त्या ठिकाणी चौक तयार होत आहे.  हा चौक  शहरातील उड्डाणपुलाच्या रेंजमध्ये येत आहे. त्यामुळे गांगोमंदिर परिसरातील नागरिक  आणि शेकडो व्यापाºयांची ये- जा करताना गैरसोय होणार आहे. तसेच कणकवली शहराच्या विकास आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या या रस्त्यांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे  नागरिकांची  गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी  अंडरपास मंजूर करण्यात यावा. तसेच संबधित निर्णय होत नाही तोपर्यंत तेथील काम बंद ठेवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. या विषयासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर तसेच कार्यकारी अभियंता बनगोसावी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. तसेच नगरपंचायतीकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे देण्यात येतील, असेही बंडू हर्णे यांनी सांगितले. यावेळी बनगोसावी यांनी ७ मे रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता तसेच वरिष्ठ अधिकाºयांची बैठक असून त्यावेळी आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यात येईल असे सांगितले. तसेच ७ मे पर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद ठेवण्याचेही कबूल केले. त्यामुळे संतप्त नागरिक काहीसे शांत झाले.

उड्डाणपुलाची परिपूर्ण माहिती द्या!मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाअंतर्गत कणकवलीत उभारण्यात येणाºया उड्डाणपुलाची परिपूर्ण माहिती नागरिकांना द्या, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांकडे केली.

कणकवलीवासीयांना कमी लेखू नका!गांगोमंदिर येथे महामार्गावर अंडरपास  होणे हा कणकवलीवासीयांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा अंडरपास न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. कणकवली शहरात महामार्गाचे काम करू दिले जाणार नाही. आमच्यावर पोलीस कारवाई झाली तरी मागे हटणार नाही. त्यामुळे कणकवलीवासीयांना तुम्ही कमी लेखू नका, असे यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांंना ठणकावून सांगितले.