शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फिशमिलविरोधात केळूसकर आक्रमक

By admin | Published: October 26, 2016 10:56 PM

कंपनीला दिलेला नाहरकत दाखला रद्द : ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांना बसविले जमिनीवर

वेंगुर्ले : केळूस ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव केळूस ग्रामसभेत घेण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीने आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला दिलेला नाहरकत दाखला ग्रामसभेने रद्द केला. या विशेष ग्रामसभेत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना चक्क खुर्चीवरून खाली उतरवून ग्रामसभेत ग्रामस्थांसोबत खाली बसविले. वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावात ग्रामपंचायत हद्दीत एका उद्योजकाने ‘आकाश फिशमिल’ हा मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरू केला असून, या कंपनीला केळूस ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिला होता. मात्र, कंपनी प्रशासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था नीट न केल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. याबाबत ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रशासनाशी बोलून त्याबाबत कल्पना दिली होती. वारंवार कल्पना देऊनसुद्धा कंपनी प्रशासनाने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वारंवार कंपनीकडे तसेच ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कंपनी व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ आॅक्टोबर रोजी या प्रश्नावर दत्तात्रय ऊर्फ दादा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली. ही ग्रामसभा दुपारी असल्यामुळे व सध्या शेतीच्या कामांची घाईगडबड असल्यामुळे ३० ते ४० ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी केळूस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विकास केळुसकर यांनी सभेची गणपूर्ती पूर्ण होत नसल्यामुळे सभा बरखास्त करण्यात येईल असे सांगितले. यामुळे उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले. ग्रामसेवकांच्या या कायदेशीर असहकार्यावर उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक, कंपनी प्रतिनिधी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य गंभीर प्रश्नावर आयोजित केलेली विशेष ग्रामसभा बरखास्त करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी १५ ते २० मिनिटांत गावातील इतर ग्रामस्थांना याची कल्पना देऊन त्यांना ग्रामसभेच्या ठिकाणी बोलावून घेतले. परिणामी सभेसाठी लागणारी गणपूर्ती झाली. ग्रामसेवक, सरपंच विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये तसेच सदस्य ग्रामसभेत असहकार्याचे धोरण घेत असल्याने २०० ते २५० ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांना जाब विचारला. ‘आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात. त्यामुळे तुम्ही ग्रामस्थांसोबत राहत नसाल, तर आताच्या आता खुर्च्या खाली करा,’ असे ग्रामस्थांनी त्यांना सुनावले. यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच, तसेच सदस्य बसलेल्या खुर्च्या काढून घेऊन त्या सभागृहाबाहेर नेऊन ठेवण्यात आल्या. यावेळी या सर्वांनाच ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसवून सभेचे कामकाज चालू केले. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कंपनी प्रतिनिधीसह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामस्थांनी सदर कंपनीकडून सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंपनीस दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेतला. अखेर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ग्रामस्थांसमोर नमते घेत ठराव मान्य केला. केळूस ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसेवक विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये सदस्य यांना जमिनीवर बसवून ही ग्रामसभा घेण्यात आली. (वार्ताहर)