सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर यांना आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी तब्बल दोन वकील आणून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला.
हिम्मत असेल तर खिलाडूवृत्तीने त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे, भावनिक आवाहन करून, राजेंचे नाव घेऊन लोकांची दिशाभूल करू नये. मतदारांचे ठरलं आहे, त्यामुळे निश्चितच ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सावंतवाडी येथे झालेल्या अर्ज छाननी प्रक्रिये दरम्यान तेली यांच्या अर्जावर केसरकर यांनी आक्षेप नोंदवला.या नंतर तेली यांनी ब्रेकिंग मालवणी कडे आपली भूमिका मांडली,ते म्हणाले अर्ज छाननी प्रक्रियेत गुन्ह्याची माहिती न दिल्याचा आरोप करीत केसरकर रडीचा डाव खेळत आहेत.
माझ्यावर दाखल असलेले गुन्हे व मालमत्तेची माहीती मी दिली आहे.काहीही लपवलेले नाही,त्यामुळे केसकर यांचा आरोप चुकीचा आहे.त्यांनी माझ्या विरोधात थेट निवडणूक लढवावी रडीचा डाव खेळून किंवा भावनिक आवाहन करून राजकारण करू नये.असे आव्हान त्यांनी केसरकरांना केले आहे.