सावंतवाडी : शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मुंबईत आज शुक्रवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेताच सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटण्यात आले.शपथविधी सोहळ््याला आमदार वैभव नाईक, राजन साळवी, पत्नी पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, मंगेश तळवणेकर, छोटू पारकर, संजय भोगटे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, देवेंद्र टेमकर, दत्तू नार्वेकर उपस्थित होते. काल, गुरुवारी रात्रीच काही शिवसैनिक मिळेल त्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले होते. सकाळपासून फक्त अधिकृत घोषणेचीच वाट पाहत होते. आमदार केसरकर यांच्या नावाची राज्यमंत्रिपदासाठी घोषणा होताच शिवसैनिकांनी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील नाक्यानाक्यांवर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. मालवण, कणकवली, देवगडमध्येही शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.आमदार केसरकर यांच्या सावंतवाडीतील श्रीधर अपार्टमेंटमधील शिवसेना शाखा /कार्यालयासमोर शिवसैनिकांनी आतषबाजी केली. शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, गजा कुडपकर, सतीश नार्वेकर, यशवंत केसरकर, गणेश मिशाळ, मुन्ना कोरगावकर, विजेंद्र पेडणेकर, बाबल्या दुभाषी, बंड्या कोरगावकर, शैलजा पाटकर, शेखर धारगळकर, उदय अळवणी, सिकंदर शहा, राजू पटेल, विकास सुकी, नितीन कारेकर, बबन बिद्रे, सुधीर धुमाळे, श्रीकांत घाग, विश्वास घाग यांच्यासह शेकडो शिवसैनिक व हितचिंतक या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. (वार्ताहर)देवगडला दुसरे कॅबिनेटदेवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे रहिवासी असलेले डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेकडून आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे देवगड तालुक्याला दोन कॅबिनेटपदे मिळाली आहेत. यापूर्वी मूळचे कुणकवण येथील असलेले विनोद तावडे हे शिक्षणमंत्री म्हणून काम करत आहेत. कोकणच्या प्रश्नांबाबत मार्ग काढूउद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे दुष्काळग्र्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देईन. तसेच कोकणचे प्रलंबित प्रश्न आणि प्रकल्पांबाबत अभ्यास करून मार्ग काढण्यात येईल. याबाबतीत चुकीचे काही होणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही नवनियुक्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना दिली.
केसरकरांच्या निवडीने सिंधुदुर्गात जल्लोष
By admin | Published: December 05, 2014 10:56 PM