खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खारेपाटण शहरात स्वयंघोषित जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा जनता कर्फ्यू संपताच ग्राहकांनी खारेपाटण मासळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शनिवार १९ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सलग ८ दिवस खारेपाटण बाजारपेठेसह संपूर्ण गाव जनता कर्फ्यूमुळे बंद होता. खारेपाटण ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन खारेपाटण यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला होता.आठवडा बाजार असल्याने खारेपाटण मासळी मार्केटमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा ग्राहकांनी व विक्रेत्यांनी फज्जा उडविल्याचे चित्र खारेपाटण मासळी मार्केटमध्ये सर्वत्र दिसत होते.
खारेपाटणमध्ये मासळी खरेदीसाठी झुंबड, जनता कर्फ्यू संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 3:16 PM
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खारेपाटण शहरात स्वयंघोषित जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा जनता कर्फ्यू शनिवारी संपताच रविवारी ग्राहकांनी खारेपाटण मासळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ठळक मुद्दे खारेपाटणमध्ये मासळी खरेदीसाठी झुंबड, जनता कर्फ्यू संपला जीवनावश्यक वस्तूंनाही प्राधान्य, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा