खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ची निवड ही राज्यातील आदर्श शाळा म्हणून झाली आहे. येथील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूषण ठरेल. असे भावपूर्ण उदगार जिल्हा परिषद बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या सत्कार प्रसंगी शुभेच्छा देताना काढले.खारेपाटण केंद्र शाळेला कणकवली तालुका पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेच्या निवडी बद्दल शिक्षकांचे व पालक, व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते सभापती दिलीप तळेकर आणि बांधकाम सभापती रवींद्र जठार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषद खारेपाटण विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा वळंजू यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त बाळा जठार व दिलीप तळेकर यांनी शाळेला भेट वस्तू देऊन शाळेचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या तृप्ती मळवदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, चिंचवली तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे, शेर्पे उपसरपंच रामा पांचाळ, खारेपाटण माजी सरपंच वीरेंद्र चिके, राजेश माळवदे, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला चिके केंद्रप्रमुख सद् गुरू कुबल, खारेपाटण शाळेचे केंद्रमुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शाळा समिती सदस्य शिवाजी राऊत, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा समीक्षा शेट्ये, समृद्धी लोकरे, रिया जाधव, शिक्षिका कोरगावकर, मोरे, अर्चना तळगावकर, पारकर आदी उपस्थित होते.शाळेकडे येणारा रस्ता जिल्हा परिषद फंडातून डांबरीकरण करणार : जठारखारेपाटण केंद्र शाळेला सदिच्छा भेट देण्यासाठी व या शाळेचे विशेष अभिनंदन करण्यासाठी कणकवली सभापती दिलीप तळेकर व बांधकाम सभापती रविंदत जठार हे खारेपाटण ला आले होते. यावेळी शाळेकडे येणारा रस्ता हा राज्य शासनाच्या फंडाची वाट न बघता जिल्हा परिषद फंडातून डांबरीकरण करून दिला जाईल असे आश्वासन यावेळी बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर तर आभार शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी मानले. यावेळी काही पालक उपस्थित होते.
शिक्षण आपल्या दारी या उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षक व पालक एकत्र जोडण्याचे काम केले. स्वाध्याय कार्ड व स्वध्यायमाला सर्व पेपर मुलांचा ऑनलाइन पेक्षा ऑफलाईन अभ्यास घेण्यात आम्ही कोरोनाच्या संकट काळात देखील यशस्वी झालो. खारेपाटण केंद्र शाळा ही माझ्या विभागातील व कणकवली तालुक्यातील असल्यामुळे आम्हा सर्वांनाच या शाळेचा अभिमान आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ही शाळा उज्जल ठरेल.- दिलीप तळेकर,सभापती