शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

मेहरबानी नको, मराठा आरक्षण हवेच :

By admin | Published: October 07, 2016 11:25 PM

नीलेश राणे

रत्नागिरी : आरक्षणाच्या हक्कासाठी मराठे आता पेटून उठले आहेत. ते ऐकणार नाहीत. सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. मेहरबानी नको, आरक्षणाचा हक्क मराठा समाजाला हवा आहे. तो द्यावाच लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी येथील कॉँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यभरात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये येत्या १६ आॅक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा होणार आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी आपली भूमिका मांडली आणि सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे ठणकावले.डिसेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारणे व मुलाखती घेण्याचे काम शुक्रवारपासून काँग्रेस भवनमध्ये सुरू केले आहे. या प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी राणे रत्नागिरीत आले होते. पहिल्याच दिवशी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडी व्हावी, यासाठी चर्चा सुरू आहे. आघाडी न झाल्यास नगरपरिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याची तयारीही कॉँग्रेसने केली आहे. येत्या सात दिवसांत नगरपरिषदेसाठी इच्छुकांना उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. याच काळात त्यांच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पारकर, तेली पक्षबदलूजो कोणी बोलावेल त्या पक्षात संदेश पारकर जातात. आम्ही त्यांना महामंडळ मिळवून दिले. मात्र, सत्ता बदलली तसे पारकरही बदलले. ‘सत्ता तेथे पारकर’ असे समीकरण झाले आहे. हे लोक गृहीत धरतात. लोक यांना कसा मान देणार ? भारतीय जनता पार्टीत राजन तेलींची अवस्था बिकट आहे. पारकर आणि तेली या पक्ष बदलंूना जनताच धडा शिकविल, असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.