म्हापण (सिंधुदुर्ग) : युवक कला-क्रीडा मंडळ, परूळे आयोजित अॅड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय तिसाव्या एकांकिका स्पर्धेत तथास्तु थिएटर्स कोल्हापूरची विलग सर्वोत्कृष्ट ठरली. समांतर संस्था सांगली यांची शेवट तितका गंभीर नाही द्वितीय तर बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या दहन आख्यानने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत श्वास अॅकॅडमी कोल्हापूर यांच्या ट्राफिकला उत्तेजनार्थ तर प्रेक्षकप्रिय एकांकिका म्हणून रसिक रंगभूमी, रत्नागिरी यांची चोरी के पीछे क्या है या एकांकिकेची निवड करण्यात आली.पुरुष अभिनय-प्रथम मयुरेश पाटील (समांतर सांगली), द्वितीय तेजस मस्के (बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ), तृतीय दिवेश विचारे (कम्फर्ट दोन मुंबई).
स्त्री अभिनय-प्रथम आसावरी नागवेकर (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर), द्वितीय निकिता तांबे (एम.एच. ४३ मुंबई), तृतीय प्रणाली पाटील (राजाराम बापू इन्स्टिट्यूट इस्लामपूर).
दिग्दर्शक-प्रथम उमेश बगाडे (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर-विलग), द्वितीय इरफान मुजावर (समांतर संस्था सांगली-शेवट तितका गंभीर नाही), तृतीय आकाश सावंत (मुंबई-पंचावन्न आणि साठीतले प्यादे).प्रकाशयोजना-प्रथम अंकुश कुलकर्णी (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर-विलग), संगीत योजना-प्रथम अनुरुप दाभाडे (विलग), नेपथ्य-प्रथम इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही).सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका- वैष्णवी शेटे (हिरविन),सुजाण प्रेक्षक स्पर्धा विजेता - विश्वनाथ सुरेश राऊत (परुळे) यांची निवड करण्यात आली.बक्षिस वितरणप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष युनियन बँंक सेवानिवृत्त अधिकारी विजय तुळसकर, डॉ. उमाकांत सामंत, आविनाश देसाई, सचिन देसाई, डॉ. प्रशांत सामंत, भूषण देसाई उपस्थित होते.
यावेळी शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेली सिद्धी माडये व शिष्यवृत्तीधारक अर्पिता सामंत यांचा, दत्ताराम वाडेकर, शाम सामंत या ज्येष्ठांचा तसेच टेलिफोन आॅपरेटर अरविंद कोंडुरकर आणि मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तपर सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले. निकाल वाचन व आभार अजित परुळेकर यांनी मानले. सतत ३० वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत उपस्थित मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले.