कोल्हापूर : महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीची बैठक रविवारी सायंकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात झाली. लिंगायत समाजाने केलेल्या न्याय्य मागण्या धुडकावून लावल्याने लिंगायत समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर दि. १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने, लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, लिंगायतमधील सर्व पोटजातींना अल्पसंख्याक दर्जाचे आरक्षण व जनगणनेच्या फार्ममध्ये लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम करावा, आदी मागण्यांसाठी यापूर्वी मोर्चे, धरणे व उपोषण करण्यात आले.
त्यानंतर चर्चेद्वारे विनंती करण्यात आली; पण सरकारने समाजाच्या मागण्या धुडकावल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या लिंगायत संघर्ष समितीची बैठक चित्रदुर्ग मठात झाली.
यावेळी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून दि. १६ आॅगस्टपासून राज्याचे दोन नंबरचे मंत्री म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, काका कोयटे, राजेद्र मुंढे, शिवानंद कुथले, चंद्रकांत कोठावळे, बाबूराव तारळी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकटली, मिलिंद साखरपे, सदाशिव देवताळे, शिवरुद्र आडके, संजय चितारी, संजय गुदगे, नीळकंठ मुगुळखोड, बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब वाली, विजय शेटे, यल्लाप्पा तळेवाडीकर, गुणवंत लक्ष्मीसागर, आदी उपस्थित होते.