कोकणचा अपेक्षाभंगरेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणेच कोकण रेल्वेच्या पदरी निराशाच पडली आहे. कोकण रेल्वेबाबत नवीन कोणताही निर्णय या अर्थसंकल्पात दिसला नाही. अच्छे दिन आने के लिये रेल्वे बजेट पुढचे पाऊल टाकील, अशी अपेक्षा होती. पण घोर निराशा झाली. ज्यांना चांगली सुविधा उपलब्ध आहे त्यांना या रेल्वे बजेटमध्ये अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. पण कोकणसारख्या प्रादेशिक विभागांना काहीच दिलेले नाही. त्यामुळे कोकण रेल्वे बजेटच्या नकाशावर आहे की नाही याबद्दल शंका निर्माण होत आहे. अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात आली
कोकणचा अपेक्षाभंग
By admin | Published: July 08, 2014 10:49 PM