सावंतवाडी - बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून कोकणच्या विद्यार्थ्यांच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
या पत्रकात केसरकर म्हणाले, बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सातत्याने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकांन उत्तीर्ण होण्याची टक्केवारी कोकणच्या मुलांनी यावर्षीही परंपरा कायम ठेवली असल्याचे ही ते म्हणाले.
गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे शक्य होऊ शकत. त्याचप्रमाणे विद्यार्थांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचही अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. संस्थाचालक देखील हा निकाल कायम ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. सर्वांच्या परिश्रमाने हे यश संपादित करता येत. सिंधुदुर्गसह शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी देखील दैदिप्यमान यश मिळवल आहे. राज्याचा शालेय शिक्षणमंत्री व कोकणचा सुपुत्र म्हणून कोकणच्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे.
ज्या मोजक्या मुलांना अपयश आलं अशांनी निराश होऊ नये. अपयश आलेल्या व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा परिक्षेस बसता येणार आहे. त्यांनी खचून न जाता या संधीचा लाभ घ्यावा. मेहनतीन यश संपादन करत चांगले गुण प्राप्त करावेत असं आवाहन केसरकर यांनी केल. तर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जीवनात चांगल्या संध्या मिळाव्यात अशा शुभेच्छा दिल्या आहेत.