लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : बारावी निकालात कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला असून, मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल १.९१ टक्के वाढल्याची माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील एकूण ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. या मंडळामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यांतून ३२ हजार ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ३० हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१८ टक्के इतके आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १९ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९४.४९ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार २३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १० हजार ८३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.५१ टक्के इतका लागला आहे. १०० टक्के निकालकोकण विभागात २४३ कनिष्ठ महाविद्यालये असून, ६० कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५पैकी २८ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.
कोकणच नंबर १!
By admin | Published: May 31, 2017 4:15 AM