रत्नागिरी/खेड : करंजाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा ट्रॅक अद्यापही जॅम आहे. अशातच पावसाचा व्यत्यय आणि गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सोयीच्या दृष्टीने म्हणून कोकण रेल्वेकडून केले जाणारे सर्व प्रयत्न पूर्णपणे फलदायी ठरलेले नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या वगळता आज, गुरुवारी पाचव्या दिवशीही वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत.करंंजाडी स्थानकातील मुख्य रुळांचे काम अद्यापही सुरू आहे. पावसामुळे या कामात व्यत्यय येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, हे काम अव्याहतपणे सुरू असून, कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचे हाल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेले दोन-तीन दिवस गाड्या १0 ते १५ तास उशिराने धावत होत्या. आज पाचव्या दिवशी मात्र यामध्ये काहीसा फरक पडला आहे. तथापि, वेळापत्रक अजूनही पूर्णपणे रुळांवर आलेले नाही. अजूनही गाड्या एक ते पाच तास विलंबाने धावत आहेत. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वेवरील विघ्न कायम
By admin | Published: August 28, 2014 11:13 PM