खेड : कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावार उसळणारी प्रवाशांची तोबा गर्दी आणि वारंवार दलालांचा होत असलेला हस्तक्षेप टाळण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक सहभाग तत्त्वावर आता आरक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ याकरिता निविदा मागविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ मेल एक्सप्रेसच्या अनारक्षित तिकिटांप्रमाणेच आरक्षित तिकिटे मिळण्याची सुविधादेखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहे़ याकरिता मॉल आणि बाजारपेठांप्रमाणेच सुपर मार्केटमध्येही आरक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या आरक्षण तिकिट विक्री केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही़ (प्रतिनिधी)
कोकण रेल्वेची तिकिटे आता सुपर मार्केटमध्येही
By admin | Published: August 28, 2014 10:05 PM