चिपळूण : येथील अॅमेझिंग ट्रेकर्स या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेतर्फे दि. १० ते २१ मे या कालावधीत हिमालय पर्वत विविधांगी अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील मनाली नगरीजवळील फेंडशीप किंवा लडाखी हिमालय शिखर ट्रेकिंग आणि गिर्यारोहण मोहीम स्थानिक प्रशिक्षित व अनुभवी हिमालयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना हिमालय पर्वताचा विविधांगी अभ्यास करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. निसर्गाची विशेष देणगी मिळालेल्या हिमालयातील स्थानिक लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्ग, पयार्यवरण, कृषी संस्कृती, साहस, प्रवास व पर्यटन, ट्रेकिंग, गिर्यारोहण व त्यासंबंधीच्या साहित्य उपकरणांची प्रत्यक्ष हाताळणी व वापर, तंबू छावणी निवासाची अनुभूती मिळणार आहे. तसेच स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद, कॅम्प फायर, मनोरंजनात्मक खेळ, निर्णयक्षमता, सांघिक एकात्मता, नेतृत्व क्षमता, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक क्षमता कसोटी, व्यक्तिमत्त्व विकास आदी मुद्द्यानुरुप विविधांगी अभ्यास या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना करता येईल. (प्रतिनिधी)
हिमालय अनुभवण्याची कोकणवासीयांना संधी
By admin | Published: February 20, 2015 9:24 PM