शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

‘कोकण’च ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2016 7:15 AM

दहावीचा निकाल : पाच वर्षांतील सर्वाेच्च निकाल ९६.५६ टक्के; कोकण विभागात सावंतवाडीची तनया वाडकर प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा राज्यात बाजी मारली आहे. कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९६.५६ टक्के इतका लागला असून, मंडळाच्या स्थापनेपासूनचा पहिला क्रमांक मंडळाने कायम ठेवला आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय सचिव व प्रभारी अध्यक्ष आर. बी. गिरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या तनया वाडकर हिने १०० टक्के गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल यंदाही सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर मंडळाने दुसरा (९३.८९ टक्के), तर पुणे मंडळाने तिसरा (९३.३० टक्के) क्रमांक मिळविला आहे. या पत्रकार परिषदेसाठी सहसचिव व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे उपस्थित होते.रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांतून ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३९ हजार ४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून २१ हजार ६१ मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी २० हजार २९२ मुले (९६.३५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. १९ हजार ७९० मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १९ हजार १५४ विद्यार्थिनी (९६.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ०.४४ ने अधिक आहे. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या तनया वाडकरने १०० टक्के गुण मिळवून कोकण विभागीय मंडळात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुनर्परीक्षार्थींचा ५१.११ टक्के निकालकोकण मंडळातून १६६९ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५३ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ५१.११ टक्के इतका लागला आहे. १५ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, संस्था, विद्यार्थी, समाज सर्वांचे उत्कृष्ट निकालामध्ये श्रेय आहे. वर्षभरातील विविध शैक्षणिक उपक्रम, जादा कोचिंग क्लासेस, सुटीतील क्लासेस व विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील उच्च गुणवत्तेसाठी महत्त्वाची ठरली आहे. दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे. कोकण मंडळाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बारकोड पद्धती कोकणात रूजत असून, त्यामुळे निकालामध्ये पारदर्शकता आली असल्याचे गिरी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गच अव्वलकोकण मंडळाच्या स्थापनेपासून सिंधुदुर्ग जिल्हाच कोकण विभागात प्रथम येत आहे. याहीवेळी बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही सिंधुदुर्गनेच प्रथम क्रमांक मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार ५३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २६ हजार ४७१ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९६.१२ टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १३ हजार ३१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १२ हजार ९७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९७.४७ टक्के इतका लागला.कॉपीचे प्रमाण शून्य टक्केरत्नागिरी जिल्ह्यात ३९२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२१ माध्यमिक शाळा आहेत. एकूण १०९ परीक्षा केंद्रे आहेत. विभागातून एकूण ४० हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. मात्र, ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. कोकण बोर्डात कॉपीचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यापाठोपाठ राज्यात सर्वांत कमी कॉपीचे प्रमाण मुंबई येथे (०.०१) आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग (०.०३ टक्के) असून, सर्वाधिक प्रमाण औरंगाबाद येथे ०.१८ टक्के आढळले आहे.निकालाचा चढता आलेखमागील दोन वर्षांचा कोकण विभागाचा दहावीचा निकाल पाहता हा आलेख चढताच राहिला आहे. २०१२ मध्ये ८१.३२ टक्के, २०१३ मध्ये ८३.४८ टक्के, तर २०१४ मध्ये ८८.३२ टक्के इतका निकाल लागला होता.