शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गावठाणातून कोकण वगळणार

By admin | Published: March 20, 2016 12:26 AM

पंकजा मुंडे : सावंतवाडीत घोषणा; लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार

सावंतवाडी : कोकणात मुळात गावठाण ही पद्धतच नाही. तरीही शासन कोकणात गावठाणचा निकष लादून अन्याय करीत आहे, असे येथील लोकांना वाटत असेल, तर आम्ही कोकणातून गावठाणचा निकष वगळू. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणू, अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्या सावंतवाडी येथे कोकण सरस कार्यक्रमस्थळी पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, ‘एसएसआरएलएम’च्या मुख्याधिकारी सुमन रावत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्याधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, आदी उपस्थित होते. डाटा एन्ट्री आॅपरेटरचा प्रश्न ग्रामविकास विभागाकडे राहिला नसून, तो मुख्यमंत्र्यांकडे आहे. ते त्यातून मार्ग काढतील. डाटा एन्ट्री आॅपरेटरचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत येत असून, माझ्याकडे हा प्रश्न असता, तर केव्हाच सोडविला असता, असे सांगत डाटा एन्ट्री आॅपरेटरचा चेंडू मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे टोलवला आहे. बचतगटांच्या मालास योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी मॉलमध्ये बचतगटांचा माल ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. नागपूर, औरंगाबाद येथून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुंडे यांनी स्पष्ट केले. कोकणचे पैसे वळविल्याची कबुली कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. येथील राहणीमानही चांगले आहे. स्वच्छतेतही कोकण नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे कोकणातील सोडविण्यासारखे मोठे प्रश्न राहिले नाहीत, अशी कोटी यावेळी मुंडे यांनी केली. कोकणचे जलसंधारणचे पैसे विदर्भ व मराठवाड्याकडे वळविण्यात आले आहेत. कारण तेथील दुष्काळ हा प्रमुख मुद्दा आहे. कोकणात पुरेसा पाऊस आहे. त्यामुळे येथे तत्काळ जलसंधारणची कामे झालीच पाहिजेत, असे काही नाही. मात्र, ज्या जिल्ह्यात गरज आहे, तेथे ती कामे होणे गरजेचे असल्याने आम्ही पैसे वळविले असल्याची कबुली मुंडे यांनी यावेळी दिली. ‘ओबीसी’चे नेते म्हणून छगन भुजबळ थोरच ‘ओबीसी’चे नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आले आहे का, असा सवाल मुंडे यांना केला असता मुंडे म्हणाल्या, ओबीसी नेते म्हणून भुजबळ हे थोरच आहेत; पण त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ती कागदपत्रे मी पाहिली नसून, त्याबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही.