शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

कुडाळ पोलीस ठाण्यात १३७ गुन्हे दाखल

By admin | Published: January 03, 2016 12:28 AM

१३ घरफोड्या : १0 जणांचा मृत्यू तर २४ अपघात

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २०१५ सालामध्ये एकूण १३७ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये घरफोडीचे १३ तर अपघातांच्या २४ गुन्ह्यांचा समावेश आहे. या अपघाताच्या गुन्ह्यामध्ये एकूण १० जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षी अल्पवयीन मुले, मुली पळवून नेणे, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार याचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र २०१४ च्या तुलनेत या गुन्ह्याची संख्या ५ ने वाढली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत यंदा एम.पी.डी.ए. अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच कारवाई एक प्रमुख वैशिष्ट्य आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून दिली आहे. २०१४ मध्ये कुडाळ पोलीस ठाण्यात एकूण १३६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये यंदा एकने वाढ होवून सन २०१५ मध्ये १३७ गुन्हे दाखल झाले. यामध्ये घरफोडीच्या १३ पैकी ८ गुन्हे उघड झाले, फसवणुकीच्या ५ पैकी ४ तर अल्पवयीन मुलांच्या ७ पैकी ७ गुन्हे उघड झाले. त्यापैकी ३ गुन्ह्यात बलात्कार व लैंगिक अत्याचार कायद्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. सरत्या वर्षामध्ये संपत्ती तसेच शरीराविरूद्धचे व बनावट नोटांच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे २०१५ मध्ये घडले. वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे चोरीमधील ४ गुन्हेगारांना अटक केली. घरफोडी करून हैराण करणाऱ्या ३ संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये एकनाथ साळसकर यांनी भूमिका बजावली. याचबरोबर रांगणा तुळसुली येथील ९६ हजारांची चोरी, आदित्य बाजारमधील चोरी यातील आरोपींना अटक केली. शैली गवस हिला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून उघड करण्यात आला. जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. अंतर्गत पहिली कारवाई कुडाळ पोलीस ठाण्यातून केली. याचबरोबर विद्यालयांमध्ये सायबर क्राईम सोशल नेटवर्किंगबाबत कार्यशाळा घेवून जागृती केली. आॅनलाईन पद्धतीने गुन्हे नोंद, तक्रारीची प्रत, खबरीची प्रत व्हॉट्सअप नंबरवर देण्यास प्रारंभ, गुन्ह्याचा तपास कार्यक्षमतेने होण्यासाठी ६ सदस्यांची विशेष समिती असे उपक्रम पोलीस ठाण्यात राबविण्यात आले. (प्रतिनिधी)