शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कुडाळ बसस्थानकाच्या दुरूस्तीसाठी धडक

By admin | Published: August 28, 2015 11:14 PM

आगारप्रमुखांना इशारा : विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही एस. टी. प्रशासन सुस्तच?

कुडाळ : धोकादायक ठरत असलेल्या कुडाळ एस. टी. बसस्थानकाच्या इमारतीची डागडुजी तत्काळ न केल्यास या स्थानकात एकही एस. टी. येऊ देणार नाही किंवा जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाच्यावतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांना देण्यात आला. प्रवाशांच्या जीवनाशी खेळू नका, तत्काळ उपाययोजना करा, असा सल्लाही दिला.कुडाळ एस. टी. स्थानकावर बसची वाट पाहत उभा असलेल्या ओमकार नाईक (रा. नेरुरपार ) या युवकाच्या डोक्यावर कुडाळ एस. टी. स्थानकाच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता. यामुळे ओमकार याच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटननेनंतर शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ एस. टी. स्थानकात धडक दिली. बसस्थानकाच्या इमारतीची पाहणी करीत कुडाळ आगारचे व्यवस्थापक हरीष चव्हाण यांना मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत अनेक प्रश्न विचारीत धारेवर धरले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अमित सामंत, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, कॉँग्रेस उपतालुकाध्यक्ष रुपेश पावसकर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, संग्राम सावंत, बाळ कनयाळकर, लालू पटेल, साबा पाटकर, कॉँग्रेसचे अनिल कुपकर, दाजी गोलम, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आगार व्यवस्थापक हरीष चव्हाण यांना अमित सावंत यांनी या इमारतीच्या नूतनीकरणाबाबत प्रस्तावाचे काय केले ते सांगा, असा प्रश्न केला. यावर चव्हाण यांनी आम्ही येथील इमारतीच्याबाबत नेहमीच प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवित असल्याचे स्पष्ट केले.यावेळी काँग्रेसचे आनंद शिरवलकर यांनीही आपण कोणत्या उपाययोजना करणार ते आम्हाला कळवा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. रूपेश पावसकर यांनी जखमी विद्यार्थ्याचा सर्व रूग्णालय व औषधोपचाराचा खर्च एस. टी. प्रशासनाने द्यावा,असे अधिकाऱ्यांना सांगितले. ही अट एस. टी.चे चव्हाण यांनी मान्य केली.यावेळी एस. टी. प्रशासनाचे राम वाडकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. येथील इमारतीच्या धोकादायक ठरत असलेल्या बांधकामाबाबत तत्काळ उपायोजना करू, असे आश्वासन चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांकडून जखमीची चौकशीही नाहीजखमी विद्यार्थ्यावर कुडाळ ग्रामीण रू ग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी एस. टी. प्रशासनाचा प्रतिनिधी त्याच्या घरी जाणे आवश्यक होते. मात्र, कोणीही अधिकारी, कर्मचारी त्याच्या घरी विचारपूस करण्याकरिता न गेल्याची माहिती या चर्चेदरम्यान मिळाली.एस. टी. बस जाऊ देणार नाही : सामंतया बसस्थानकाची दुरूस्ती किंवा नुतनीकरण लगेच होऊ शकत नाही. हे खरे असले, तरी येथील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्काळ याठिकाणी जाळ्या लावा. तसेच सूचना फलक व इतर उपाययोनजा करा, अन्यथा एस. टी. बस यापुढे जाऊ देणार नाही, असे अमित सामंत यांनी सांगितले.