शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

कुडाळला वादळाचा तडाखा

By admin | Published: July 10, 2016 11:41 PM

महामार्गावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प : अणाव रमाईनगरात घर जमीनदोस्त

कुडाळ : शनिवारी मध्यरात्री कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले. कुडाळ येथील महामार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प होती. गेले दोन ते तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात रविवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच काहीवेळ झालेल्या चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला. अणाव-शेळणवाडी येथील चंद्रकांत परब यांनी गुरे बांधलेल्या मांगराची भिंत कोसळल्याने या मांगरातील गुरे जखमी झाली. गुरांच्या हंबरण्यामुळे जागे झालेल्या परब कुटुंबियांनी लागलीच गुरांना सुरक्षितस्थळी हलविले. कुडाळात काहीवेळ झालेल्या चक्रीवादळामुळे कुडाळ येथील सत्यम हॉटेलसमोरील महामार्गावर सुरूचे झाड कोसळल्याने रविवारी मध्यरात्री महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. वर्दे-खालची पालववाडी येथील नळयोजनेच्या शेडचे पत्रे उडून गेल्याने नळयोजनेचा स्टार्टर व रेग्युलेटरमध्येही बिघाड झाल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले.(प्रतिनिधी) कुडाळ-आंबेडकरनगर येथे पूरस्थिती ४रविवारी रात्री संपूर्ण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भंगसाळ नदीला रात्री पूर आला. पुराचे पाणी नजीकच्या डॉ. आंबेडरकरनगर येथील परिसरात घुसून रहिवाशांची धावपळ उडाली. सकाळी पुराचे पाणी ओसरले. ४अणाव-रमाईनगर येथील अनिता जाधव या वृद्ध महिलेने इंदिरा आवास योजनेतून घर बांधले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या वादळामुळे तिच्या घरावर चिंचेचे मोठे झाड पडून पूर्ण घरच जमीनदोस्त झाले. झाड कोसळण्याच्या आवाजाने जाधव यांनी घरातून बाहेर पळ काढल्याने त्या बचावल्या. अनिता जाधव या घरात एकट्याच राहत असून, झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.