शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

कुडाळात नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल

By admin | Published: March 25, 2016 11:20 PM

शहरात बारा हजार मतदारांची नोंद : सतरा प्रभाग, नऊ महिला-आठ पुरूष, अकरा खुले, पाच ओबीसी, एक अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव

रजनीकांत कदम -- कुडाळ --जिल्ह्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या असणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल एकदाचे वाजले. या निवडणुकीत शहराची सतरा प्रभागात विभागणी केली असून प्रभागनिहाय आरक्षणाने नऊ महिला तर आठ पुरूष तर अकरा सर्वसाधारण गटासाठी, पाच ओबीसी तर एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शहराची सोळा हजार लोकसंख्या असून बारा हजार मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुकास्थळ हे नगरपंचायत करण्याच्या शासन निर्णयानुसार कुडाळ शहर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याची अधिसूचना प्रशासनाने १० आॅगस्ट २०१५ रोजी काढली. कुडाळ ग्रामपंचायत बरखास्त होऊन या नव्या नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून शासनाच्यावतीने कुडाळचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार प्रविण लोकरे यांची नेमणूक करण्यात आली आणि कुडाळ नगरपंचायतीची स्थापना होत कुडाळच्या नव्या इतिहासाला सुरूवात झाली. नव्या कुडाळ नगरपंचायतीची सतरा प्रभागात विभागणी करण्यात आली. यानुसार रचना केलेले प्रभाग व त्यामध्ये पडलेले प्रभागनिहाय्य आरक्षण पुढीलप्रमाणे :प्रभाग क्र. १) कविलकाटे-मस्जिद मोहल्ला- (खुला) २) भैरववाडी-पानबाजार (खुला), ३) लक्ष्मीवाडी - (खुला), ४) बाजारपेठ-पानबाजार (ओबीसी पुरूष), ५) कुडाळेश्वरवाडी - शिवाजीनगर (खुला महिला), ६) गांधी चौक-प्रभावळकरवाडा (ओबीसी पुरूष), ७) डॉ. आंबेडकरनगर-भोसलेवाडी, माठेवाडी (एस. सी महिला), ८) मस्जिद मोहल्ला -करोलवाडी, तुपटवाडी (खुला), ९) नाबरवाडी-गोधडवाडी, दत्तनगर (ओबीसी महिला), १०) केळबाईवाडी-औदुंबरनगर (खुला), ११) वाघसावंत टेंब - गणेशनगर (खुला महिला), १२) हिंदू कॉलनी - पोलीस वसाहत, जडये चाळ परिसर (खुला महिला), १३) श्रीरामवाडी - लक्ष्मीवाडी (खुला महिला), १४) अभिनवनगर -विठ्ठलवाडी, आेंकारनगर (ओबीसी महिला), १५) मधली कुंभारवाडी -इंद्रप्रस्थनगर (ओबीसी महिला), १६) एमआयडीसी परिसर - वेंगुर्लेकरवाडी, वरची कुंभारवाडी (खुला महिला), १७) सांगिर्डेवाडी - उद्यमनगर (खुला). या प्रक्रियेत १७ जागांच्या नगरपंचायतीमध्ये ९ महिला व ८ पुरूष अशी विभागणी झाली. तसेच इतर आरक्षण पाहिले असता अनुसूचित जातीसाठी १ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता ५ जागा व सर्वसाधारणकरिता ११ जागा असे आरक्षण ठरविण्यात आले.कुडाळची एकूण लोकसंख्या ही १६,०१५ एवढी आहे. त्यापैकी मतदार हे १२,०६० इतके असून, यामध्ये पुरूष ६,११५ व महिला मतदारांची ५,९४५ इतकी संख्या आहे. प्रभागनिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे : कविलकाटे (पुरूष ४१९, महिला ३८५) एकूण मतदार ८०४, भैरववाडी-पुरूष ३९०, महिला ४०३, एकूण मतदार ७९३, लक्ष्मीवाडी-पुरूष ३२४, महिला ३११ एकूण ६४५, बाजारपेठ-पुरूष ४२६, महिला ४०६ एकूण ८३२, श्रीदेव कुडाळेश्वरवाडी - पुरूष ४०१ महिला ३८५ एकूण ७८६, गांधीचौक - पुरूष ३५५, महिला ३४३ एकूण ६९८, डॉ. आंबेडकरनगर-पुरूष ३०९, महिला ३१९ एकूण ६२८, मस्जिद मोहल्ला-पुरूष १६०, महिला १३७ एकूण २९७, नाबरवाडी-पुरूष ३७४ महिला ३६४ एकूण ७३८, श्री देवी केळबाईवाडी-पुरूष ३३८ महिला ३१८ एकूण ६५६, वाघसावंत टेंब-पुरूष ३०५, महिला ३०८, एकूण ६१३, हिंदू कॉलनी-पुरूष ३६८, महिला ३८७ एकूण ७५५, श्रीरामवाडी-पुरूष ४३३ महिला ४२८ एकूण ८६१, अभिनवनगर-पुरूष २५८ महिला २५५ एकूण ५१३, मधली कुंभारवाडी-पुरूष ४०७ महिला ३८० एकूण ७८७, एमआयडीसी परिसर-पुरूष ४३९, महिला ३८४ एकूण ८२४, सांगिर्डेवाडी - पुरूष ४०९ महिला ४३२ एकूण ८४१. सर्वात कमी मतदार संख्या असलेला प्रभाग मस्जिद मोहल्ला आहे. येथे फक्त २९७ मतदार आहेत. तर सर्वात जास्त मतदार श्रीरामवाडी या प्रभागात असून येथे ८६१ एवढे मतदार आहेत.नेतेमंडळीकडून संपर्काला सुरूवातआरक्षणाने मोजक्याच उमेदवारांची संधी कायम राहिली आहे तर अनेकजणांची कोंडी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली असून नेत्यांच्या संपर्काला सुरुवात झाली आहे. नव्या नगरपंचायतीची निवडणूकही आता नव्या ढंगात लागल्याने चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. दरम्यान, काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआय अशा राजकीय पक्षांमधून कमीअधिक जागांवर ही निवडणूक लढविली जात आहे.