सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच व १२ सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूर ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने गुलाल उधळला. तर तिरवडे तर्फ सौंदळ ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. निकालानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला.तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ, कुसुर आणि मौदेच्या एका जागेसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. सोमवारी सकाळी १० वा येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरु झाली. तिरवडे तर्फे सौंदळ सरपंचपदाच्या चौरंगी लढतीत भाजपाच्या मनिषा मनोहर घागरे(९४ मते) या अवघ्या फक्त दहा मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मानसी खानविलकर ८४, पुर्वा घागरे ४८, सुचिता घागरे यांना ३० मते मिळाली.तर मौदे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या एका जागेवर विजय मोतीराम मोरे यांनी(६८ मते) प्रतिस्पर्धी श्रीकृष्ण अर्जुन मोरे(२७) यांच्यावर ४१ मतांनी विजय मिळवला.आखवणे-भोम सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार आर्या अभय कांबळे (३५० मते) यांनी प्रतिस्पर्धी सुनंदा सुरेश जाधव (१६१ मते) यांच्यावर तब्बल १८९ मतांनी दणदणीत विजय मिळवला. तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या कुसूर सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाभिमानच्या शिल्पा शिवाजी पाटील (५०९ मते) यांनी विद्यमान सरपंच स्मिता संतोष पाटील (३४९ मते) याचा १६० मतांनी पराभव केला. सरपंचपदाचे निकाल जाहीर होताच स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला.ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी झालेले मतदान पुढीलप्रमाणे : आखवणे-भोम: स्मिता संतोष नागप (१३२ मते, विजयी), सुनंदा वसंत नागप (८५ मते), आकाराम यशवंत नागप (१४४ मते, विजयी), मनोहर दत्ताराम नागप (७७ मते), संतोष मोहन पांचाळ (१०८ मते,विजयी), शांतीनाथ मानाजी गुरव(८३ मते), वनिता विनोद जांभळे (१५० मते विजयी), सुमित्रा विजय भालेकर (४४ मते).तिरवडे तर्फ सौंदळ- अशोक पांडुरंग घागरे (७२ मते, विजयी), चंद्रकांत जर्नादन घागरे(५३ मते) पराभूत झाले.कुसुर ग्रामपंचायत वर्षा विलास पाष्टे(१९३ मते विजयी), आकांशा आत्माराम साळुंखे (१५८ मते), नितीन शांताराम कुळये (१६० मते, विजयी), आकाराम विष्णु सांवत (१५० मते विजयी), समाधान गणपत साळुंखे (१४० मते), विलास विष्णु पाटील (१२४ मते), संतोष अनाजी साळुंखे (१२३ मते), सारीका गोपाळ जाधव(२५० मते विजयी), सत्यवती भिवाजी पाटील (१६४ मते, विजयी), गोपीका आकाराम बोबडे(१३४ मते) पराभूत झाल्या. तहसीलदार रामदास झळके, निवासी नायब तहसीलदार नाईक, नायब तहसीलदार जी. आर. गावीत, अव्वल कारकून संभाजी खाडे, कैलास पवार यांनी लक्ष ठेवून मतमोजणी शांततेत पार पाडली.
कुसूर, आखवणे-भोममध्ये स्वाभिमानचा झेंडा, निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 2:22 PM
वैभववाडी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच व १२ सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूर ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने गुलाल उधळला. तर तिरवडे तर्फ सौंदळ ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. निकालानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला.
ठळक मुद्देकुसूर, आखवणे-भोममध्ये स्वाभिमानचा झेंडा, निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोषकुसूर सरपंच पराभूत; तिरवडे तर्फे सौंदळवर भाजपाचा दावा