तळवडे , दि. १६ : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
श्री देवी माऊली देवस्थान हे जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहून देवी माऊलीचे दर्शन घेतात. मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागरी आदी भागातून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात.
दरम्यान, जत्रोत्सवासाठी माऊली मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या काही मोठ्या जत्रा आहेत त्यांची सुरुवात सोनुर्लीच्या जत्रेपासून होते. अशा या प्रसिद्ध सोनुर्ली यात्रेसाठी सोनुर्लीवासीय सज्ज झाले आहेत.
लोटांगणाचा जत्रोत्सवसोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. देवीला भाविक लोटांगणाचा नवस बोलतात. नवस पूर्ण होऊन मनोकामना पूर्ण झाल्यानंतर लोटांगण घालून नवसफेड केली जाते. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू असतो.