शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खारेपाटण संभाजीनगरमध्ये भूस्खलन, काजूबागेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:06 PM

गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा दणका १५ गुंठे जमिनीवरील जंगली झाडेही कोसळली

खारेपाटण : गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या संभाजीनगर येथील फळबागायती असलेल्या त्यांच्या सुमारे १५ गुंठे जमिनीत भूस्खलन झाले. या जमिनीला भेगा व तडे जाऊन ती बाधित झाली आहे. यात काजू, खैर व जंगली झाडांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी रमाकांत डगरे यांनी तातडीने भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्त बागेची व जागेची पाहणी केली. पंचयादी घालून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे तलाठी रमाकांत डगरे यांनी यावेळी सांगितले.खारेपाटण संभाजीनगर येथील मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेली डोंगर भागातील सर्व्हे क्र. ३/२ ची जमीन मधुकर गुरव यांच्या मालकीची आहे. या जमिनीमध्ये त्यांनी काजू कलमे लावली आहेत. या व्यतिरिक्त खैर व इतर झाडेदेखील होती.

परंतु, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात गुरव यांच्या या जमिनीच्या काही डोंगर भागातील मातीचे उत्खनन करून दुसऱ्या ठिकाणी भराव करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने तो तोडण्यात आला होता.जमिनीचा डोंगर भाग हा १५० फूट लांब व जमिनीच्या पातळीपासून सुमारे ३० फूट उंचीएवढा सरळ उभा कापण्यात आला होता. त्यामुळे तो उंच दरडीसारखा धोकादायक झाला होता. भूस्खलन झाल्याने गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनsindhudurgसिंधुदुर्ग