बांदा : जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बळिराजा भात शेतीकामात गुंतला असून भात लावणीची कामे अंतीम टप्यात असून सावंतवाडी तालुक्यातील वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे, डेगवे, तांबुळी, असनिये मोरगांव परिसरात नाचणी पेरणी, आंबे, काजु कलमे लागवडी व मशागत करणे आदि कामांना वेग आला.काही ठिकाणी नागरणींची कामे पॉवर ट्रेलरने केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने नांगरणी कमी होत असताना आणि मजूर मिळत नसल्याने पॉवर टिलरने नागरणी केली जाते. काही ठिकाणी आजही पारंपारिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी केली जाते.
महिना भरापासून कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी भात लावणीची असून अंतीम असल्याचे चित्र दिसत आहे. आणि नाचणी पेरणीच्या कामाला वेग आला आहे आणि बळीराजा सुखावला आहे.