शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षांच्या गाडीवर लाथा

By admin | Published: April 21, 2015 11:39 PM

भर रस्त्यातील प्रकार : स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी काढला राग; गाडी अडवून चप्पलाने मारण्याचाही प्रयत्न

कणकवली : महामार्गावर गाडी आडवी लावत जिल्हा परिषदेच्या माजी महिला अध्यक्षांची गाडी अडवून स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गाडीवर लाथा घातल्या. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता येथील प्रांत कार्यालयासमोर घडलेल्या या प्रकाराने सारेच अचंबित झाले. प्रांत कार्यालयासमोर सायंकाळी अचानक एक इनोव्हा गाडी तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या नव्या कोऱ्या मरून रंगाच्या कारसमोर आडवी घातली. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ही नवी कोरी गाडी स्वत: चालवत होत्या. झटक्यात इनोव्हा गाडीतून जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या आणि त्यांचे पती उतरले आणि धावून जात गाडीवर लाथा घालण्यास सुरूवात केली. माजी अध्यक्षा खाली न उतरता कारमध्येच बसून होत्या. महिला सदस्यांनी कारच्या काचेवर हात आपटले. त्यांच्या पतीने ‘आ’ की ‘बा’ न पाहता मारलेल्या लाथांनी नव्या कारची बॉडीही चेपली. या झटापटीत महिला सदस्यांनी माजी अध्यक्षांना चप्पलाने मारण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये पडलेले चप्पल काही अंतरावर माजी अध्यक्षांनी कारबाहेर टाकले आणि त्या मार्गस्थ झाल्या. भर रस्त्यात घडलेल्या मिनिटभराच्या या प्रकाराने पाहणारेही अवाक झाले. ‘बंगल्या’वर या नाट्याचा पूर्वरंग आधीच पूर्ण झाला होता, असे समजते. यात माजी अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या यांच्यात दुपारी ‘बंगल्या’वर आधीच बाचाबाची होऊन तेथे एकमेकींच्या झिंज्या उपटण्यात आल्या होत्या. मात्र, वरिष्ठ पातळीवर समज देऊन तात्पुरता पडदा टाकला होता. मात्र, धुमसत असलेल्या रागाचे पडसाद शेवटी रस्त्यावर अशारितीने उमटले. तिन्ही पदाधिकारी कुडाळ तालुक्यातील असल्याने कुडाळसह या प्रकाराची चर्चा वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली. सार्वजनिक ठिकाणी जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबद्दल वरिष्ठ आता कोणता निर्णय घेणार? याबद्दल चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)