सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीची जुनी इमारत निर्लेखित केली गेली असल्याने आता नवी इमारत होई पर्यत जिल्हापरीषदेच्या बांधकाम विभागाचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र या बांधकाम विभागाच्या इमारतीलाही आता गळती लागली असून, बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच सभापती कार्यालयाच्या मागील भागाला गळती लागली असून, अधिकारी व कर्मचारी त्यातूनच आपला कार्यभार हाकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर कोणती ही कार्यवाही अद्याप पर्यत करण्यात आली नसून, या नव्याने बांधलेल्या इमारतीला अवघे सात ते आठ वर्षे होण्यापूर्वीच ही गळती लागली आहे.सावंतवाडी पंचायत समितीची नुतन इमारत कुठे बांधायची या विंवेचनात सध्या हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. मात्र जुनी इमारत कधीही कोसळेल, म्हणून या इमारतीला निर्लेखित करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात पंचायत समितीचे कार्यालय हलविण्यात आले आहे. गेले वर्षभर या कार्यालयातून तालुक्याचा कारभार हाकला जात आहे. मात्र ऐन पावसातच बांधकाम विभागाच्या या कार्यालयाला गळती लागली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालय बांधून अवघे सात ते आठ वर्षे झाली असून, आता या इमारतीला गळती लागली आहे.कर्मचाऱ्यांना याच गळक्या इमारतीचा आधारबांधकाम विभागाचे अधिकारी यातूनच आपला कारभार हाकत होते. मात्र आता सभापतीचे कार्यालय असलेल्या ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे तालुक्याचा कारभार जुन्या इमारतीमधून नवीन इमारतीकडे जाण्याऐवजी गळक्या इमारतीमध्ये अडकून पडला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी याच गळक्या इमारतीमध्ये बसत होते. तर आता सभापतीचे दालन असलेल्या मागील ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकारयाबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते बोलण्यास तयार नाही. आठ वर्षापूर्वी ही इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असे ते सांगत आहेत. पण कधी पासून गळती लागली असे विचारले असता, यावर्षीपासूनच गळती लागली, असे म्हणत यावर पडदा टकाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सावंतवाडी पंचायत समितीतून तालुक्याचा कारभार हाकला जातो. पण सावंतवाडी मात्र पंचायत समितीच्या नव्या कार्यालयाला मुहूर्त मिळत नाही. आणि जुन्या कार्यालयाकडे कोण लक्ष देईना, अशी काहीशी अवस्था झाली आहे.
पंचायत समितीच्या इमारतीला गळती, सावंतवाडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 2:54 PM
सावंतवाडी पंचायत समितीची जुनी इमारत निर्लेखित केली गेली असल्याने आता नवी इमारत होई पर्यत जिल्हापरीषदेच्या बांधकाम विभागाचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र या बांधकाम विभागाच्या इमारतीलाही आता गळती लागली असून, बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच सभापती कार्यालयाच्या मागील भागाला गळती लागली असून, अधिकारी व कर्मचारी त्यातूनच आपला कार्यभार हाकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर कोणती ही कार्यवाही अद्याप पर्यत करण्यात आली नसून, या नव्याने बांधलेल्या इमारतीला अवघे सात ते आठ वर्षे होण्यापूर्वीच ही गळती लागली आहे.
ठळक मुद्देपंचायत समितीच्या इमारतीला गळती, सावंतवाडीतील प्रकार पूर्वीचे बांधकाम विभागाचे कार्यालय