सिंधुदुर्ग : परुळे बाजार येथील मनोहर सामंत यांच्या विहिरीत पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या पडला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला कळविले असून त्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची टीम परुळे येथे दाखल झाली आहे.भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला अंदाज न आल्यामुळे तो विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. आज मंगळवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी ही गोष्ट पाहिली. त्यानंतर या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.गेले काही दिवस परुळे परिसरात बिबट्याची दहशत होती. अनेक पाळीव प्राण्यावर त्याने हल्ले केले होते. दरम्यान बिबट्या विहिरीत पडला समजताच परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली आहे. या बिबट्याला सुखरूप पणे बाहेर काढण्यासाठी सव्वानऊ वाजता वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच पोलिस ही दाखल झाले आहेत.
परुळे येथील घटना; भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 11:21 AM
Leopard sindhudurg orest department- परुळे बाजार येथील मनोहर सामंत यांच्या विहिरीत पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या पडला आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला कळविले असून त्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची टीम परुळे येथे दाखल झाली आहे.
ठळक मुद्देपरुळे येथील घटना;भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला बिबट्या बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाची टीम दाखल