कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर साईगाव येथे गुरुवारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत बिबट्या दिसल्याची माहिती येथील ग्रामस्थ सूर्यकांत भिकाजी कुंभार (रा. साईगाव) यांनी वनपाल नेरूर त. हवेली यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.दोन दिवसांपूर्वी दाभिल येथे वाघिणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर आता नेरूर साईगाव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. या ठिकाणी वनपाल यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानुसार वनपालांनी घटनेबाबतची माहिती वनक्षेत्रपाल विकास कुंभार यांना दिली आहे.
वनविभागाकडून चौकशी सुरूबिबट्या मृत झाल्याचे दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे शवविच्छेदन केले असता, हा बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे अंदाजे वय ४ ते ५ वर्षे असल्याचे सांगितले. याबाबत वनविभागाने चौकशी सुरू केली आहे.