सिंधुदुर्ग : विश्वासाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत. आमच्या विश्वास यात्रेवर विरोधक टीका करत असून आमच्यावर विश्वास आहे की नाही हे आम्ही येत्या २०१९ च्या निवडणुकीत दाखवून देऊ असे प्रतिपादन स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आचरा येथे केले.
स्वाभिमानच्या विश्वास यात्रेचा शुभारंभ मालवण तालुक्यातील आचरा येथे झाला. खासदार राणे यांनी आचरा येथे श्री देव रामेश्वराला साकडे घालत भव्य रॅली काढत टेंबली हॉल येथे सभा झाली. यावेळी नीलम राणे, निलेश राणे, दत्ता सामंत, सतीश सावंत, संदीप कुडतरकर, रेश्मा सावंत, शशांक मिराशी, रणजित देसाई, संतोष साटविलकर, अशोक सावंत, मंदार केणी, राजू परुळेकर, बाबा परब, यतीन खोत, नीलिमा सावंत, प्रणिता टेमकर, जिज्या टेमकर, भाऊ हडकर, संतोष कोदे, विकास कुडाळकर, दीपक सुर्वे, जेरॉन फर्नांडिस, अवधूत हळदणकर, भाऊ हडकर, सतीश प्रभू, डॉ. प्रमोद कोळंबकर, सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, सुमेधा पाताडे व अन्य मान्यवर मोठया संख्येने हजर होते
यावेळी राणे म्हणाले की सत्ताधाºयांनी विश्वास ठेवण्यासारख काय केले? ते दाखवा. शिवसेना-भाजपने कोणती कामे केली? रस्त्यांची काय परिस्थिती आहे? चार वर्षांपूर्वी कसे रस्ते होते? एक तरी प्रकल्प त्यांनी सुरू केला काय ? खासगी विमान उडविण्याचे नाटक केले. मी पाचशे कारखाने परवाना देऊन दोडामार्ग एमआयडीसी जाहीर केली. सत्ताधारी पांढºया पायाचे आहेत. विश्वासाची भाषा आमदार, खासदारांनी करू नये. आमदारांना जाब विचारायला हवा. आम्ही विकास केला ते लोक अनुभवत आहेतमच्छिमारांचा वापर मतांसाठी केलाआम्ही बोलतो तसं करतो. कोकणी जनता सुखी व्हायला पाहिजे. शिक्षण दर्जेदार मिळाले पाहिजे. विमानतळ सुरू झाल्यावर पायलट प्रशिक्षण देणार. पैसे कमवायला हॉस्पिटल नाही काढले. उपचार याच जिल्ह्यात व्हावेत यासाठी हॉस्पिटल काढले. मी उपक्रम सुरू केले त्यातील एकतरी उपक्रम स्वत:च्या पैशांनी विरोधकांनी काढावा. सत्ताधारी काय करू शकणार नाहीत. आम्ही जनतेला आधार देण्याचे काम करतो. मच्छिमारचा वापर आमदार आणि खासदार यांनी मतांसाठी केला. मच्छीमारांनी घाबरू नका. तुमची गाडी कोण अडवणार नाही. गाडी अडविली तर एकही गाडी येऊ देणार नाही. माझा माणूस उपाशी राहता नये, अशी आमची भावना आहे. आम्हाला साथ द्या. जिल्ह्याची, महाराष्ट्राची स्थिती बदलण्याची ताकद आमच्यात आहे. स्वाभिमानला साथ द्या. आम्ही कामे करून विश्वास दाखवून देऊ असेही राणे यांनी सांगितले.