आॅनलाईन लोकमत सिंधुदुर्गनगरी,दि. ८ : चला बोलू नैराश्य टाळू प्रकल्पातंर्गत वेलनेस क्लिनिकचे उद्घाटन आरोग्य शिक्षण विभागाचे माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरवात रवळनाथ मंदिर ते आर. टी. ओ. आॅफिस अशी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रमोद कामत यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. जे. नलावडे, मानसोपचार तज्ञ डॉ. सुनिल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. संतोष जी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.नैराश्य याआजारा संबधी जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक आजाराइतकेच मानसिक आजाराला उपचारामध्ये महत्वाचे स्थान आहे. लपवाछपवी दूर होणे हा महत्वाचा सामाजिक टप्पा आहे. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रूग्णालयात अंतरंग वेलनेस क्लिनिकचे उद्गाटन करण्यात आले. युवक-युवती, प्रौढ तसेच वृध्दांमध्ये असणा-या नैराश्याच्या समुपदेशनाकरीता हा नाविण्यपूर्ण उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला. आरोग्याची गुरूकिल्ली यावर डॉ. रूपेश धुरी यांनी मार्गदर्शन केले. नैराश्य या विषयावर आयोजित केलेल्या पोस्टर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी पार पडला.
चला बोलू नैराश्य टाळू अंतर्गत वेलनेस क्लिनिकचा नाविण्यपूर्ण उपक्रम
By admin | Published: April 08, 2017 3:56 PM