शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

दिव्यांगांच्या रोजगारासाठी प्रयत्न करू

By admin | Published: October 07, 2016 9:36 PM

दीपक केसरकर : कुडाळमध्ये दिव्यांगांना साहित्याचे वाटप; प्रशासनाचेही कौतुक

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या प्रकियेमध्ये दिव्यांग व्यक्तींना सामावून घेऊन त्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केंद्र्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिल्ली येथील अ‍ेलिम्को संस्था व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्यावतीने सुगम्य भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव, खुर्ची, सायकल व इतर साहित्याचे वितरण कार्यक्रम कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील दिव्यांग व्यक्तींना या उपक्रमातंर्गत गरजेनुसार उपकरणांचे वाटप करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्याची सुरुवात कुडाळ तालुक्यापासून करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मुंबईचे नगरसेवक अरुण दुधवडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे, देवानंद काळप, बाळा वेंगुर्लेकर, श्रेया गंवडे, जीवन बांदेकर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार राऊत म्हणाले, शासन व प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केल्यास कशा चांगल्या गोष्टी निर्माण होतात, याचे चांगले उदाहरण म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रशासनाने जशी तत्परता दाखविली. तशीच तत्परता यापुढेही प्रशासनाने दाखवावी, असे आवाहनही राऊत यांनी केले, तर आमदार वैभव नाईक म्हणाले, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना असतात, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. त्यामुळे शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सदैव कार्यतत्पर राहणार आहोत. यावेळी कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना गरजेनुसार कृत्रिम अवयव, खुर्ची, सायकल व इतर साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. ही योजना राबविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना बरोबरच मोठ्या प्रमाणात परिश्रम घेणारे नागेंद्र परब यांचा पालकमंत्री केसरकर यांनी सत्कार केला. डॉ. योगेश साळे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. नागेंद्र परब यांनी आभार मानले. (प्रतिनिधीदाखले देण्यासाठी अडवू नका : राऊतजिल्ह्यातील सर्व दिव्यांगांसाठी गरजेनुसार सर्व प्रकारची आवश्यक उपकरणे या योजनेंतर्गत देण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले दाखले प्रशासनाने न अडविता त्यांना लवकरात लवकर द्यावेत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.